सोयाबीन उत्पादनावर मोहरीवर्गीय तणांची सावली

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 एप्रिल 2018

मोहरीवर्गातील काही तणांमुळे अमेरिकेतील मध्य पश्चिमेतील राज्यांमध्ये सोयाबीन उत्पादनाला फटका बसण्याचे संकेत संशोधकांनी दिले आहेत. सोयाबीन रोपांच्या जवळ वाढलेल्या तणांमुळे पडणाऱ्या सावली व अन्य परिणामांमुळे पिकाच्या उत्पादनामध्ये ७६ ते ९० टक्क्यांपर्यंत घट होत असल्याचे आढळले आहे.

नेब्रास्का लिंकन विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करत असलेल्या एथन बार्नेस यांनी सांगितले, की केवळ तण म्हणूनच मोहरीवर्गीय वनस्पती धोकादायक नाहीत, तर त्यांची उंची सोयाबीन पिकापेक्षा वेगाने वाढून एकूण उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याचा धोका समोर आला आहे. २०१५ आणि २०१६ मध्ये केलेल्या प्रयोगामध्ये सोयाबीन सह मोहरी तणांच्या वाढीचा अभ्यास केला. या प्रयोगामध्ये मोहरीवर्गीय तणांची घनता शून्यापासून १२ वनस्पती प्रति मीटर (सुमारे ३९ इंच) राहिली. 

एक तणामुळे त्याच ओळीतील १.६ फूट सोयाबीनवर परिणाम होतो. २०१५ मध्ये या सोयाबीन रोपांचे उत्पादन सुमारे ७६ टक्क्यांने कमी झाले, २०१६ मध्ये ४० टक्क्याने घटले. 

- सोयाबीन रोपापासून तीन इंच अंतरावर असलेल्या मोहरीवर्गीय तणामुळे सन २०१५ मध्ये ९५ टक्के, तर सन २०१६ मध्ये ८० टक्क्याने घट झाल्याचे दिसले.  हे निष्कर्ष अमेरिकन सोसायटी ऑफ अॅग्रोनॉमीमध्ये प्रकाशित केले आहेत.

Web Title: agro news mustard weed