कांदा निर्यात घटली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

नवी दिल्ली - ऑक्टोबर २०१७ पर्यंतच्या सात महिन्यांत देशातील कांदा निर्यात घटली आहे, असे अपेडाने नुकतेच प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीहून स्पष्ट होत आहे. 

अपेडाच्या ऑकडेवारीनुसार २०१७ मधील ऑक्टोबरपर्यंतच्या सात महिन्यांत देशातून होणारी कांदा निर्यात १.०३ दशलक्ष टन होती. २०१६ मध्ये या कालावधीत ती १.३७ दशलक्ष होती. तुलनेत कांदा निर्यात कमी झाली आहे.

देशांतर्गत स्थानिक बाजारपेठांमध्ये चांगले दर मिळत असल्याच्या पार्श्वभूमीवर व्यापारी आणि निर्यातदारांनी निर्यात काहीशी कमी केली आहे, अशी माहिती राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन संस्थेच्या सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि राजस्थानमध्ये कांदा पिकास फटका बसल्याने बाजारपेठांमधील कांदा आवकेवर परिणाम झालेला दिसून आलेला आहे. 

दक्षिणेकडील राज्यांमधून कांद्याला चांगली मागणी आहे. यामुळे बाजारपेठांतली आवक वाढूनही दर स्थिर असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या अंदाजानुसार देशात २०१७ मध्ये २१.४ दशलक्ष टन कांदा उत्पादन होण्याचा अंदाज आहे. तुलनेने कांदा उत्पादनात ४.६ टक्के घट होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली होती.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agro news onion export decrease