esakal | कांदा उत्पादन घटणार
sakal

बोलून बातमी शोधा

कांदा उत्पादन घटणार

कांदा उत्पादन घटणार

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली - केंद्रीय कृषी मंत्रालयाने मंगळवारी (ता. २) भाजीपाला, फळे उत्पादनाचा पहिला आगाऊ अंदाज जाहीर केला. त्यानुसार यंदा कांद्याचे २१.४ दशलक्ष टन उत्पादन होणार आहे. गेल्या वर्षात कांदा उत्पादन २२.४ दशलक्ष टन होते. तुलनेत ३ दशलक्ष टनांनी कांदा उत्पादन कमी राहण्याची भीती आहे.

प्रतिकूल हवामान आणि लागवड क्षेत्रात घट झाल्यामुळे यंदा देशातील कांदा उत्पादन गेल्या वर्षापेक्षा कमी राहणार आहे. परंतु बटाटे, टोमॅटो उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे. कृषी मंत्रालयानुसार २०१७-१८ मध्ये एकूण फलोत्पादन ३०५ दशलक्ष टन राहण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षात ३००.६ दशलत्र टन फलोत्पादन झाले होते.

loading image