रब्बीची पावणेसहा लाख हेक्‍टरवर पेरणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

पुणे - थंडी वाढू लागल्याने पुणे विभागात रब्बी पिकांच्या पेरण्यांना वेग आला आहे. सध्या हरभरा, गहू पेरणीने चांगलाच वेग घेतला आहे. विभागात आत्तापर्यंत सरासरी १७ लाख ३६ हजार ७० हेक्‍टर क्षेत्रापैकी ५ लाख ८५ हजार २९० हेक्‍टरवर म्हणजेच ३३ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

पुणे - थंडी वाढू लागल्याने पुणे विभागात रब्बी पिकांच्या पेरण्यांना वेग आला आहे. सध्या हरभरा, गहू पेरणीने चांगलाच वेग घेतला आहे. विभागात आत्तापर्यंत सरासरी १७ लाख ३६ हजार ७० हेक्‍टर क्षेत्रापैकी ५ लाख ८५ हजार २९० हेक्‍टरवर म्हणजेच ३३ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

विभागात तृणधान्याचे सरासरी क्षेत्र १५ लाख ३० हजार ५३० हेक्‍टर आहे. त्यापैकी आत्तापर्यंत पाच लाख ३१ हजार ७२० हेक्‍टर म्हणजेच ३४.७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली. विभागात सर्वाधिक क्षेत्र रब्बी ज्वारीचे आहे. विभागात ज्वारीची पाच लाख १ हजार ३८० हेक्‍टरवर म्हणजेच ३८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यापाठोपाठ गहू, मक्‍याची पेरणी झाली आहे. कडधान्याचे सरासरी क्षेत्र एक लाख ७३ हजार ३८० हेक्‍टर आहे. त्यापैकी ५१ हजार ८४० हेक्‍टर म्हणजेच २९ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गळीत धान्याचे सरासरी क्षेत्र ३२ हजार १६० हेक्‍टर आहे. त्यापैकी १७३० हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. 

विभागातील नगर जिल्ह्यात मशागतीची कामे पूर्ण झाली आहेत. ज्या ठिकाणी वापसा आलेला आहे. त्या ठिकाणी पेरणी झाली आहे. रब्बी ज्वारी, मका व हरभरा पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. नगर, कर्जत, पारनेर, जामखेड, श्रीगोंदा, नेवासा तालुक्‍यात सर्वाधिक पेरणी झाली आहे. शेवगाव, पाथर्डी, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता तालुक्‍यात अत्यल्प प्रमाणात पेरणी झाली आहे. 

पुणे जिल्हयातील मावळ, मुळशी तालुक्‍यात हळव्या भातपिकाची काढणी सुरू झाली आहे. पूर्वेकडील शिरूर, दौंड, पुरंदर, बारामती, इंदापूर, खेड तालुक्‍यात रब्बी हंगामातील ज्वारी, मका पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. गहू व हरभरा पिकांच्या पेरणीस सुरवात झाली आहे. बारामती तालुक्‍यात सर्वाधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर, इंदापूर, दौंड, पुरंदर तालुक्‍यात अत्यल्प प्रमाणात पेरणी झाली आहे.  मुळशी, भोर, मावळ, वेल्हे तालुके रब्बी पेरणीपासून दूर आहेत.  

सोलापूर जिल्ह्यात खरीपातील तूर शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. रब्बी हंगामातील ज्वारी, मका व हरभरा वाढीच्या अवस्थेत आहे. जिल्ह्यातील बहुतांशी तालुक्‍यात रब्बी ज्वारीची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली आहे. त्याखालोखाल हरभऱ्याची पेरणी झाली असल्याचे चित्र आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agro news rabbi sowing