आयात शुल्क वाढविल्याने सोयाबीन, उडीद, मुगाला भाव - पाशा पटेल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 डिसेंबर 2017

मुंबई - महाराष्ट्रासह देशभरातील सोयाबीन, मूग, उडीद उत्पादकांच्या शेतमालाच्या दरात चांगली सुधारणा झाली आहे. केंद्र सरकारने ५ ऑगस्ट ते १७ नोव्हेंबर दरम्यान घेतलेल्या निर्णयांनंतर ही वाढ झाली असून, या निर्णयांमुळे महाराष्ट्रातील सोयाबीनला २७५० ते २९९०, तर उडदाला ३५०१ ते ५६०० इतका दर मिळण्यास सुरवात झाली. सोयाबीनची खासगी कंपन्या ३,१२० रुपयांनी सध्या खरेदी करत असल्याची माहिती राज्याच्या कृषी आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सोमवारी (ता. ४) केला. 

मंत्रालयातील वार्ताहर कक्षात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पाशा पटेल पुढे म्हणाले, की केंद्र सरकारने आयात शुल्कात  मोठ्या प्रमाणावर वाढ केली असून विविध शेतमालांवरील निर्यात शुल्क कमी करण्यात आलेले आहे.

यूपीए सरकारच्या काळात क्रूड पामतेलावर १५ टक्के आयात शुल्क होते, त्यात दुपटीने वाढ करत आता ३० टक्के करण्यात आले आहे. तर, पूर्वी रिफाइन पामतेलावर असलेल्या २५ टक्के आयात शुल्कात वाढ करत ते ४० टक्के, सूर्यफूल तेलाच्या आयात शुल्कातही १२.५ टक्क्याने वाढीसह क्रूड सोयाबीन तेल, रिफाइन सोयाबीन तेल, क्रूड आणि रिफाइन रेपसीड मोहरी कनोला तेलांवर ही १२.५ ते १५ टक्के आयात शुल्कात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे याचा देशांतर्गत शेतकऱ्यांना वाढीव दराच्या रूपात लाभ मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर राज्यात हरभरा आणि पिवळा वाटाण्याच्या दरातही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून, या पिकांच्या पेरणी क्षेत्रातही वाढ झाली आहे. 

सध्या मिळत असलेल्या कडधान्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होणार असून, एकट्या सोयाबीनच्या दरात जानेवारी महिन्यात ३,२०० रुपयांपर्यंत वाढ होणार असल्याचा अंदाजही पाशा पटेल यांनी व्यक्त केला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agro news soyabean udid, mug rate increase by import tax