जनावरांच्या आहारात असावीत जीवनसत्त्वे

अजय गवळी, प्रणिता सहाणे
रविवार, 17 सप्टेंबर 2017

जनावरांची निकोप वाढ आणि शरीर क्रियेसाठी आहारातून आवश्यक जीवनसत्त्वांची गरज असते. त्यांच्या कमतरतेमुळे जनावरांचे स्वास्थ्य बिघडते. ही पोषणद्रव्ये सेंद्रिय संयुक्त पदार्थ असून शरीरवाढीसाठी, शरीर स्वास्थ्यासाठी अतिशय अल्प प्रमाणात लागतात. त्यांनाच ‘जीवनसत्त्वे’ म्हणतात. 

 जीवनसत्त्वे ही शरीरातील उतींमध्ये नैसर्गिक चयापचयासाठी अल्प प्रमाणात आवश्‍यक असतात.

 जीवनसत्त्वांचा अभाव असल्यास विशिष्ठ रोग होतात. जीवनसत्त्वांचा साठा करून ठेऊ शकत नाही; कारण हवेशी संपर्क आल्यास ती नष्ट होतात.

 काही जीवनसत्त्वे शरीरातच तयार होतात, तर काही आहारातून घ्यावी लागतात. काही जीवनसत्त्वे आहारातून मिळत नाहीत, त्याच्या अभावाने रोग होतात. 

स्निग्धात विरघळणारी जीवनसत्त्वे 
जीवनसत्त्व अ 
फायदे 

 पचनसंस्थेच्या अवयवांचा आतील स्तर चांगला रहातो.
 वाढ, रोग प्रतिकारक शक्ती आणि प्रजननक्षमता अबाधित ठेवण्यासाठी उपयोगी.
अभाव 
 रातआंधळेपणा येतो,
 वार न पडणे, जनावर उशिरा माजावर येणे, स्रीबीजांड बाहेर पडण्याची क्रिया लांबणे. मुका माज दिसतो.
उपलब्धता     
हिरवी मका, हिरवे गवत, दूध, गाजर

जीवनसत्त्व ड
फायदे     

 हे कॅल्शियम व स्फुरदाचे रक्तात रूपांतर करण्यासाठी आवश्यक असते.    
अभाव 
 मुडदूस रोग होतो. रक्तातील कॅल्शियम व स्फुरदाचे शोषण योग्य प्रकारे होत नाही. 
 दातांचा विकार व हाडे ठिसूळ बनतात.
 गुडघ्यामध्ये पोकळी, सांध्याचा आजार दिसतो.
उपलब्धता 
 जनावरे काही वेळ कोवळ्या उन्हात बांधावीत.
 उन्हात वाळलेले गवत भरपूर प्रमाणात द्यावे.

जीवनसत्त्व इ 
फायदे 

 जीवनसत्त्व इ व सेलेनियमचा संयुक्त पुरवठा केल्यास जनावरे उलटण्याचे प्रमाण कमी होते.
 शरीर निकोप ठेवण्यासाठी तसेच कातडी निरोगी ठेवण्यासाठी फायद्याचे आहे.
 प्रजननासाठी आवश्यक
अभाव 
 हृदयाच्या स्नायुवर विपरीत परिणाम होतो.
 कमतरतेमुळे प्रजनन व वंधत्वाचे रोग होतात.
 जनावर माजावर येत नाही.
उपलब्धता 
 प्रजनन क्षमतेची उणीव दिसून आल्यास जीवनसत्त्व इ.चे इंजेक्शन द्यावे.
 योग्य प्रमाणात चारा व धान्य पदार्थ आहारात असावेत. 
जीवनसत्त्व के
फायदे 

 रक्त गोठविण्यासाठी फायदेशीर
अभाव 
 जखमेतून रक्त स्राव जास्त होतो.
उपलब्धता 
 सर्व प्रकारचा हिरवा चारा जनावरांच्या आहारात द्यावा.
 हे जीवनसत्त्व खाद्यातून द्यावे लागते.

पाण्यात विरघळणारी जीवनसत्त्वे
जीवनसत्त्व ब 
फायदे     

 मज्जातंतू कार्यान्वीत होण्यासाठी फायद्याचे.
 चयापचयाच्या क्रियेला चालना देण्यासाठी महत्त्वाचे.
अभाव 
 मज्जातंतू सुजतात, स्नायुंची हालचाल होत नाही.
उपलब्धता 
 इंजेक्शनद्वारे जीवनसत्त्व ब दिले जाते.
जीवनसत्त्व क 
फायदे     

 रोगप्रतिकारशक्ती तसेच जखमा भरून येण्यासाठी फायदेशीर आहे.
अभाव 
स्कर्व्ही हा रोग होतो.
उपलब्धता 
 इंजेक्शनद्वारे जीवनसत्त्व क दिले जाते.
टीप - पशुतज्ज्ञांकडूनच जनावरांना जीवनसत्त्व पुरविणारे इंजेक्शन द्यावे.

Web Title: agro news Vitamins should be in the animal's diet