डाळिंबाच्या दरात मंदीचा कल

मनोज कापडे
सोमवार, 18 डिसेंबर 2017

देशभरातील प्रमुख बाजारपेठांमधून महाराष्ट्राच्या डाळिंबाला मागणी कमी आहे. त्यामुळे पुढील एक-दोन आठवडे डाळिंबाचे बाजार मंदीत राहतील, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. 

उत्तर भारतामधील डाळिंबाची प्रमुख बाजारपेठ असलेल्या दिल्ली मार्केटला डाळिंबाची सध्या रोज २० ते ३० ट्रक आवक होत आहे. उत्तरेतील प्रतिकूल हवामान आणि वाढलेली आवक यामुळे दिल्लीत डाळिंबाचे दर गेल्या तीन आठवड्यांपासून घसरलेले आहेत. 

``दिल्लीत महाराष्ट्रातून रोज १०-१५ ट्रक तर गुजरातमधून १५-२० ट्रक डाळिंब येत आहे. महाराष्ट्राच्या डाळिंबाची क्वालिटी गुजरातच्या तुलनेने चांगली आहे. मात्र, आवक वाढल्यामुळे मागणी कमी झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मालाचे भाव १००० ते १२०० रुपयांवरून (प्रति १० किलो) घसरून २५० ते ७०० रुपयांपर्यंत आले आहेत,`` अशी माहिती दिल्लीतील काही व्यापाऱ्यांनी दिली. गुजरातच्या मालाचे दरही ५०० रुपयांवरून  घसरून २०० ते ४०० रुपयांपर्यंत आले आहेत. 

गुजरातच्या डाळिंबाची आवक अजून कमीच आहे. त्यात आणखी वाढ अपेक्षित आहे. महाराष्ट्राच्या मालाला गुजरात डाळिंबाशी पुढील दोन महिने झुंज द्यावी लागेल. गुजरातमध्ये निवडणुकांचा माहोल असल्यामुळे पंधरवड्यात आवक कमी होती. पुढील आठवड्यापासून मात्र आवक वाढती राहील, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. 

दिल्लीत धडका मारणारे गुजरातचे डाळिंब नाशिक मार्केटवर परिणाम करत आहे. सध्या नाशिकला ८-९ हजार क्रेटची (प्रति २० किलो) आवक असून भाव १००० ते १२०० रुपये प्रति क्रेट आहे. शिवार सौदेदेखील सध्या ३५ ते ४० रुपये प्रतिकिलो इतक्या कमी दराने सुरू आहेत. उत्तरेतील प्रमुख बाजारपेठा तसेच दिल्लीतील मागणी घटल्यामुळे नाशिकच्या कसमादे पट्ट्यातील भाव कमी झाले आहेत, असे डाळिंब वाहतूक व्यावसायिकांचे म्हणणे आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला बाजारात आवक भरपूर आहे. मागणी कमी असतानाही रोज तीन हजार जाळी माल येत असल्यामुळे भाव ३०-४० रुपये प्रतिकिलोच्या वर जाण्यास तयार नाही. आवक कमी झाली तरच सांगोल्यात भाव वाढण्यास संधी आहे. सोलापूरचा माल सध्या चेन्नई, कोईम्बतूर, केरळात जातो आहे. मात्र, कर्नाटकातदेखील डाळिंब काढणीला आले आहे. पुढील महिन्यापासून कर्नाटकची आवक वाढेल, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agrowo news pomegranate