निवडुंगाच्या फळांना वाढती मागणी

निवडुंगाच्या फळांना वाढती मागणी

आत्तापर्यंत कोरडवाहू, वाळवंटातील दुर्लक्षित वनस्पती म्हणून निवडुंगाकडे बघितले जायचे. परंतु निवडुंगाच्या काही जाती मानवी खाद्यासाठी उपयुक्त असल्याचे दिसून आल्यामुळे या जातींची लागवड अमेरिकेतील शेतकऱ्यांनी गेल्या काही वर्षांपासून सुरू केली. त्यामुळे आता निवडुंगाची फळे आणि प्युरी अमेरिकेतील बाजारपेठांत दिसू लागली आहे.  

अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील शेतकऱ्यांनी अमेरिका आणि कॅनडामधील बाजारपेठांची मागणी लक्षात घेऊन खाण्यासाठी योग्य निवडुंगाची लागवड सुरू केली. त्याची स्वतंत्र बाजारपेठही विकसित झाली आहे. निवडुंगाच्या फळांना खाण्यासाठी शहरी भागात मागणी वाढत आहे. यंदाच्या वर्षी कॅलिफोर्निया राज्यातील हवामान बदलामुळे निवडुंगाचे उत्पादन थोडे उशिरा सुरू झाले. निवडुंगाचा हंगाम आॅगस्ट ते मार्च या कालावधीत असतो. परंतु यंदा आॅक्टोबरपासून निवडुंगाच्या फळांच्या काढणीस सुरवात झाली. यंदा तापमानात मोठी वाढ झाली. त्यानंतर हवामानात बदल होऊन बेमोसमी पाऊसही झाला. अतिउष्णता आणि त्यानंतर पावसानंतर थंड वातावरणामुळे  निवडुंगाच्या फळांच्या गुणवत्तेवर परिणाम झाला, असा येथील निवडुंग उत्पादक शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

 यंदाच्या वर्षी आॅगस्ट-सप्टेंबरमध्ये निवडुंगाच्या फळांचे फारसे उत्पादन हाती लागले नाही, परंतु आॅक्टोबरनंतर मात्र फळांच्या उत्पादनात वाढ मिळू लागली आहे. डिसेंबर-जानेवारीमध्ये थंडीचा कालावधी असल्याने पुन्हा फळांच्या उत्पादनवार परिणाम होणार आहे. त्याचा फळाची गुणवत्ता आणि त्यातील साखरेवर परिणाम होईल असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. येथील काही शेतकरी निवडुंगाच्या फळांची प्युरी तयार करतात. आरोग्यदायी गुणधर्मामुळे प्युरीलादेखील फळांइतकीच मागणी आहे. निवडुंगाच्या फळांना अमेकिरेच्या बरोबरीने कॅनडा आणि इटालीमधून मागणी वाढलेली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com