शिमला मिरचीने दिला आर्थिक हातभार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 मार्च 2018

वडवणी - वडवणी तालुक्‍यातील खळवट लिमगाव येथील शेतकऱ्याने ३५ गुंठे जमिनीत शिमला मिरचीचे तब्बल अडीच लाखांचे उत्पन्न घेतले आहे.

शेतकरी सावळाराम उबाळे यांनी जानेवारीत शिमला मिरचीची लागवड केली. लागवडीपासून तोडणीपर्यंत पन्नास हजार रुपये खर्च आला आणि उत्पन्न अडीच लाखांचे निघाले. शेतातील बोअरमधून ठिबकद्वारे पाणी दिले. आजपर्यंत ८० क्विंटल मिरची निघाली. आणखी १० ते १५ क्विंटल माल शिल्लक आहे. बीड व औरंगाबादच्या मंडईत विक्री केली. ३०-४० प्रतिकिलो भाव मिळाला. 

श्री. उबाळे म्हणाले, की या वर्षी कपाशीच्या पिकातून खर्चही निघाला नाही. त्यामुळे काही तरी वेगळे पीक घेण्याचे ठरविले आणि शिमला मिरची लावली. कपाशीच्या पिकात झालेले नुकसान शिमला मिरचीने भरून काढले आहे.

Web Title: agrowon news Capsicum farmer