कोल्हापुरात हिरवी मिरची दहा किलोस ३०० ते ५०० रुपये

राजकुमार चौगुले 
मंगळवार, 27 मार्च 2018

कोल्हापूर : येथील शेती उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात ओल्या मिरचीची दररोज तीनशे ते चारशे पोती आवक झाली. ओली मिरचीस दहा किलो ३०० ते ५०० रुपये दर मिळाला. ढोबळी मिरचीस दहा किलोस पाचशे ते सहाशे रुपये दहा किलोस १०० ते २०० रुपये दर मिळाला. गवारीच्या आवकेत मोठी घट झाली. गवारीस दहा किलोस १०० ते २०० रुपये दर मिळाला. ओल्या वटाण्याची दररोज शंभर ते दीडशे पोती आवक झाली. ओल्या वटाण्याला दहा किलोस  ३०० ते ४०० रुपये दर मिळाला. दोडक्‍याची शंभर ते दीडशे करंड्या आवक झाली. दोडक्‍यास दहा किलोस १०० ते ३५० रुपये दर होता. 

गेल्या सप्ताहापासून भाजीपाला बाजारात मोठी अस्वस्थता आहे. याचा परिणाम या सप्ताहातही पाहावयास मिळाला. दर घसरल्याने अनेक शेतकऱ्यांना भाजीपाला काढणेही परवडत नसल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांनी भाजीपाला शेतातच नष्ट करण्यास प्रारंभ केल्याने स्थानिक ठिकाणाहून होणाऱ्या आवकेत घट झाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. गेल्या सप्ताहाच्या तुलनेत कोबी, टोमॅटो, फ्लॉवरची स्थानिक भागातून होणारी आवक पंचवीस टक्‍क्यांपर्यंत घटली होती. बेळगाव भागातून मात्र भाजीपाल्याची नियमित आवक सुरू आहे. 

कोथिंबिरीची दररोज दहा ते पंधरा हजार पेंढ्यांची आवक होती. कोथिंबिरीस शेकडा ३०० ते ६०० रुपये दर मिळाला. मेथीच्या आवकेतही घट होती. मेथीची दररोज तीन ते पाच हजार पेंढ्या आवक होती. मेथीस शेकडा ३०० ते ५०० रुपये दर होता. फळांमध्ये द्राक्षाची दररोज वीस ते पंचवीस बॉक्‍स आवक झाली. द्राक्षास किलोस २० ते २५ रुपये दर होता. अननसाची नव्वद ते शंभर डझन आवक झाली. अननास डझनास ५० ते ४५० रुपये दर मिळाला. 

या सप्ताहात गुळाच्या आवकेत घट झाली. गुळाची दररोज सरासरी पाच हजार रव्यांची आवक झाली. दर मात्र गेल्या सप्ताहाच्या तुलनेत स्थिर होते. गुळास क्विंटलला ३००० ते ४००० रुपये किंवटल इतका दर मिळाला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agrowon news green chili kolhapur