चला जालन्याला... ॲग्रोवनच्या कृषी प्रदर्शनाला...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जानेवारी 2018

जालना - शेतकऱ्यांसह सर्वांचीच उत्सुकता लागून असलेल्या सकाळ -ॲग्रोवनच्या कृषी प्रदर्शनाला उद्योगनगरी म्हणून ख्याती असलेल्या जालना शहरात शुक्रवारी (ता. १९) प्रारंभ होत आहे. शेतकरी व संबंधित क्षेत्राला ज्ञानातून विकासाकडे आणि आधुनिकतेतून समृद्धीकडे नेण्याचा प्रयत्न या प्रदर्शनातून केला जाणार असल्याने शेतकऱ्यांसह सर्वांसाठी ही मोठी पर्वणी राहणार आहे. 

जालना - शेतकऱ्यांसह सर्वांचीच उत्सुकता लागून असलेल्या सकाळ -ॲग्रोवनच्या कृषी प्रदर्शनाला उद्योगनगरी म्हणून ख्याती असलेल्या जालना शहरात शुक्रवारी (ता. १९) प्रारंभ होत आहे. शेतकरी व संबंधित क्षेत्राला ज्ञानातून विकासाकडे आणि आधुनिकतेतून समृद्धीकडे नेण्याचा प्रयत्न या प्रदर्शनातून केला जाणार असल्याने शेतकऱ्यांसह सर्वांसाठी ही मोठी पर्वणी राहणार आहे. 

सकाळ-ॲग्रोवनच्या माध्यमातून कृषी क्षेत्राला विकासाच्या दिशेने नेण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातात. शेतकऱ्यांना शेती व पूरक क्षेत्रातील नवतंत्रज्ञानाशी अवगत करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो. त्याचाच एक भाग म्हणून जालन्यात आयोजित कृषी प्रदर्शनाकडे पाहिले जात आहे. मे. बी.जी. चितळे आणि चितळे जिनस एबीएस  इंडिया या प्रदर्शनाचे सहप्रायोजक आहेत. 

शेतकऱ्यांसाठी माहितीचा खजिना असणाऱ्या या कृषी प्रदर्शनात आधुनिकतेकडे नेणाऱ्या तंत्रज्ञानाचा आविष्कार पाहायला मिळणार आहे. हे प्रदर्शन म्हणजे ज्ञान व माहितीचा एकप्रकारे खजीनाच असणार आहे. प्रदर्शनाच्या माध्यमातून आयोजित केल्या जाणाऱ्या परिसंवादाच्या दालनात नामवंत तज्ज्ञांचे प्रगतिशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शनही प्रदर्शनाला भेट देणाऱ्या व सहभागी होणाऱ्यांना दररोज लाभणार आहे. 

प्रदर्शनात हे बघता येईल 
या प्रदर्शनाच्या माध्यमातून तंत्रज्ञान व कृषिविषयक उत्पादनाच्या विविध कंपन्या शेतकऱ्यांच्या भेटीला येत आहेत. यामध्ये ट्रॅक्‍टर्स, हार्वेस्टिंग यंत्रे, विविध प्रकारची अवजारे व कापणी यंत्र उत्पादक कंपन्या, जैविक कीटकनाशके, विद्राव्य खते, ग्रीन हाउस टेक्‍नॉलॉजी आणि इंप्लीमेंट्‌स, बियाणे उत्पादक टिश्‍युकल्चर, ठिबक व तुषार सिंचन, पॅकेजिंग आणि कोल्ड स्टोरेज इंडस्ट्रीज, ग्रेडिंग,वेईंग, सोर्टिंग अवजारे उत्पादक कंपन्या,  कृषी साहित्य प्रकाशन, कृषी संशोधन संस्था सहभागी होत आहेत. 

तीन दिवस चालणार प्रदर्शन 
जालन्यातील नगरपालिकेच्या आझाद मैदानावर १९ ते २१ जानेवारीदरम्यान तीन दिवस हे प्रदर्शन होणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेदरम्यान हे प्रदर्शन शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांसाठी खुले राहणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agrowon news jalna agriculture jalna farmer