नागपूर बाजारात हरभरा, तुरीच्या दरांत घसरण

नागपूर बाजारात हरभरा, तुरीच्या दरांत घसरण

नागपूर - स्थानिक कळमणा बाजार समितीत हरभरा, तूर, सोयाबीन यांसारख्या मुख्य शेतीमालाच्या दरांत घसरण होत असल्याचे चित्र आहे. हरभरा ३४६२ रुपये प्रतिक्‍विंटलवरून ३४४४ रुपये क्‍विंटलवर पोचला. तूर गेल्या आठवड्यात ४१०० रुपये क्‍विंटल होती. तुरीच्या दरातही घसरण होत ३९५८ रुपयांवर हे दर पोचले. 

बाजार समितीत गेल्या आठवड्यात हरभरा ३००० ते ३४६२ रुपये प्रतिक्‍विंटल होता. हरभऱ्याची आवक ५५०८ क्‍विंटलची नोंदविली गेली. त्यानंतर आठवड्यातच पुन्हा दरात घसरण होत हे दर ३१०० ते ३३८६ रुपये क्‍विंटलवर पोचले. २४ मार्च रोजी २३१३ क्‍विंटल हरभरा आवक झाली. आवक कमी झाल्यानंतरही दरात घसरण झाली आहे. २० मार्च रोजी तुरीची २६६९ क्‍विंटल आवक नोंदविण्यात आली. ३६०० ते ४१०० रुपये क्‍विंटल दराने या दिवशी तुरीचे व्यवहार झाले. त्यानंतर मात्र तुरीच्या दरात घरसण झाल्याचे व्यापारी सूत्र सांगतात. २४ मार्च रोजी १८१४ क्‍विंटल आवक झाली, तर दर ३६५० ते ३९५८ क्‍विंटलवर पोचले. जवसाचीदेखील बाजारात २० क्‍विंटल आवक झाली. ४००० ते ४२०० रुपये क्‍विंटलचा दर जवसाला मिळाला. २०० मार्च रोजी एकच दिवस ही आवक झाल्याचे व्यापारी सांगतात. सोयाबीनचीदेखील बाजरात आवक होत असून, ३२०० ते ३६७१ रुपये क्‍विंटल सोयाबीनचे दर होते. २० मार्चला ५१४ क्‍विंटल सोयाबीनची आवक नोंदविली गेली. २४ मार्च रोजी ३२०० ते ३६०० रुपये क्‍विंटलने सोयाबीनचे व्यवहार झाले. २६८ क्‍विंटलची आवक या दिवशी नोंदविण्यात आली. 

संत्रा, मोसंबीची आवक 
बाजारात संत्रा, मोसंबीची आवक नियमित आहे. मोठ्या आकाराच्या संत्रा फळांना २८०० ते ३४०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर होता. २० मार्चला २००० क्‍विंटलची आवक झाली. संत्रा दरात तेजी अनुभवता आली. ३००० ते ४००० रुपये क्‍विंटलवर दर पोचले. संत्र्यांची २००० क्‍विंटल आवक झाली. मोसंबीचे दर ३००० त ४००० रुपये क्‍विंटल होते. त्यात घसरण होत २६०० ते ३२०० रुपये क्‍विंटलवर ते आले. मोसंबीची २४ मार्चला ३५० क्‍विंटल आवक झाली. 

बटाटा स्थिर
भंडारा, नागपूर जिल्ह्यांत शेतकऱ्यांद्वारे बटाटा उत्पादन होते. त्यासोबतच लगतच्या मध्य प्रदेशमधूनदेखील बटाटा आवक होत आहे. ८०० ते १००० रुपये क्‍विंटल दराने बटाट्याचे व्यवहार होत होते. २१ मार्चला ९०० ते ११०० रुपये क्‍विंटलचा अपवाद वगळता आता दर ८००  ते १००० रुपयांवर स्थिर आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com