नांदेडचे माकूरवार तीन लाखांच्या दागिन्यांचे मानकरी

नांदेडचे माकूरवार तीन लाखांच्या दागिन्यांचे मानकरी

पुणे - बारा महिने हजार समस्यांशी झुंजत कष्टाने शेती करणाऱ्या अॅग्रोवनच्या शेतकरी वाचकांसाठी आयोजिलेल्या ‘अॅग्रोवन शुभलाभ योजने’ची सोडत आज समारंभपूर्वक काढण्यात आली. राज्यभरातील वाचकांमध्ये प्रचंड उत्सुकता लागून असलेल्या या योजनेत शेतकऱ्यांनी विक्रमी सहभाग नोंदविला होता. विविध स्वरूपाच्या १४२४ बक्षिसांसाठी आलेल्या हजारो प्रवेशिकांमधून भाग्यवान शेतकऱ्यांची नावे सोडतीद्वारे काढण्यात आली. तीन लाख रुपयांचे हिऱ्याच्या दागिन्यांचे पहिले बक्षीस नांदेडचे शेतकरी साईनाथ गंगाधर माकूरवार यांना मिळाले आहे.

तीन सप्टेंबर ते १४ डिसेंबर २०१७ या कालावधीत ‘अॅग्रोवन’च्या शेतकरी वाचकांसाठी ही राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात आली. पु. ना. गाडगीळ आणि सन्स, स्मार्टकेम टेक्नॉल़ॉजीज लिमिटेड, पारस इंडस्ट्रीज, रोहित स्टील, अॅग्रोस्टार, अॅन्डस्लाईट असे नामवंत प्रायोजक या स्पर्धेला लाभले. 

‘अॅग्रोवन’च्या पुणे मुख्यालयात योजनेचा सोडत कार्यक्रम टाळ्यांच्या गजरात पार पडला. या वेळी व्यासपीठावर पु. ना. गाडगीळ आणि सन्सचे सीईओ अमित मोडक, स्मार्टकेम टेक्नॉलॉजीजचे उपसरव्यवस्थापक सतीश नरतम व संजय जगताप, पारस इंडस्ट्रीजचे केतन लोढा, रोहित स्टीलचे व्यवस्थापक अनुप मोदी, अॅग्रोस्टारचे सहायक व्यवस्थापक दुर्गाप्रसाद उपाध्याय, अॅन्डस्लाइट कंपनीचे महाराष्ट्र राज्य सुपर स्टॉकिस्ट प्रकाश शिंदे तसेच अॅग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण, सरव्यवस्थापक प्रमोद राजेभोसले, मुख्य व्यवस्थापक (वितरण) चंद्रशेखर जोशी उपस्थित होते. 

अॅग्रोवन शुभलाभ योजनेतील प्रमुख बक्षिसांचे मानकरी
पहिले बक्षीस (पु. ना. गाडगीळ आणि सन्स यांचे तीन लाखाचे हिऱ्यांचे दागिने) साईनाथ गंगाधर माकूरवार (सावळी, ता. बिलोली, जि. नांदेड)

दुसरे बक्षीस (पु. ना. गाडगीळ अाणि सन्स यांचे दोन लाखाचे हिऱ्यांचे दागिने) विठ्ठल नामदेव मोहिते (लऊळ, माढा, सोलापूर)

तिसरे बक्षीस (संख्या ३) (पु. ना. गाडगीळ अाणि सन्स यांचे एक लाखाचे हिऱ्यांचे दागिने) बालाजी भाऊराव हरकरे (विडूळ, उमरखेड, यवतमाळ), अर्चना ज्ञानेश्वर इंगळे (दाबका, उमरगा, उस्मानाबाद), विश्वास वामनराव देशमुख (नांदुरा, बुलढाणा)

चौथे बक्षीस (संख्या २) (रोहित स्टीलचे ६० हजाराचे बियाणे-खते पेरणीयंत्र) रामप्रसाद प्रकाश धोंगडे (तिवरंग, उमरखेड, यवतमाळ), खंडेराव माधवराव शिंदे (ओझरमिग, निफाड, नाशिक).

पाचवे बक्षीस (संख्या २) (रोहित स्टीलचे ५४ हजाराचे बियाणे-खते पेरणीयंत्र) मयुर शिवाजी जगदाळे (आंधळी, पलुस, सांगली), हरिभाऊ कचरू हाळनोर (कोळपेवाडी, कोपरगाव, नगर)

सहावे बक्षीस (संख्या २) (पारस इंडस्ट्रीजचे ५० हजाराचे ठिबक सिंचन संच) महावीर भूपाल हावळे (आळते, हातकणंगले, कोल्हापूर), पाशा वजीरसाब तांबोळी (हाळी, उदगीर, लातूर)

सातवे बक्षीस (संख्या ३) (रोहित स्टीलचे ३८ हजाराचे बियाणे-खते पेरणीयंत्र) संभाजी धोंडिराम बोराडे (शेगाव, जत, सांगली), विलास हरसिंग जामदार (वेळापूर, माळशिरस, सोलापूर), अस्लमअली खाँ उस्मानअली खाँ (परतूर,जालना)

आठवे बक्षीस (संख्या २) (पारस इंडस्ट्रीजचे ३७५०० हजाराचे स्प्रिंकलर संच) सुनील विश्वासराव परिहार (भालगाव, चिखली, बुलढाणा), गोपाळ किसन पाटील (पडधाळे, पाचोरा, जळगाव), 

नववे बक्षीस (संख्या ३) (रोहित स्टीलचे ३१ हजाराचे बियाणे-खते पेरणीयंत्र) प्रकाश विश्वासराव पाटील (बेडग, मिरज, सांगली), प्रल्हाद लालचंद बच्छाव (सोयगाव, मालेगाव, नाशिक), जगदीश श्रीहरी म्हस्के (गडचिरोली),

दहावे बक्षीस (संख्या २) (रोहित स्टीलचे २१ हजाराचे बियाणे-खते पेरणीयंत्र) कविता खाशाबा राऊत (गोरखपूर, सातारा), उमेश रघुनाथ रामाणे (वाफगाव, खेड, पुणे), 

अकरावे बक्षीस (संख्या ३) (रोहित स्टीलचे सात हजाराचे बियाणे-खते पेरणीयंत्र) प्रताप बबनराव जाधव (बारामती, पुणे), सदाशिव जानकीराम जगताप (पुंगळा, जिंतूर, परभणी), संपतराव केशवराव नलावडे (नागठाणे, सातारा) या विजेत्यांना अॅग्रोवनतर्फे बक्षीस वितरणाचा तपशिल पत्राद्वारे कळविण्यात येईल.

याशिवाय स्मार्टकेम टेक्नॉलॉजीजकडून प्रत्येकी पाच हजार रुपये किंमतीची रासायनिक खताची १०० बक्षिसे दिली जात आहेत. पारस इंडस्ट्रीजकडून प्रत्येकी एक हजार रुपये किमतीचे पारसची मिरॅकल उत्पादने ३२५ विजेत्यांना मिळतील. अॅग्रोस्टार कंपनीकडून ५०० विजेत्यांना प्रत्येकी एक हजार रुपयांची गिफ्ट कुपन्स मिळणार आहेत. अॅन्डस्लाईट कंपनीकडून ४७५ विजेत्यांना ८४५ रुपये किमतीची नॅनो रिचार्जेबल बॅटरी दिली जाणार आहे. या भाग्यवान विजेत्यांची नावे येत्या  ५ फेब्रुवारीपासून अॅग्रोवनच्या अंकात क्रमश: प्रसिद्ध होणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com