उपलब्धता अन् इच्छा यावर ठरतो आहाराचा दर्जा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

भाज्या आणि फळे खाणे हे आरोग्यासाठी फायद्याचे असल्याचे सर्वांना ज्ञात आहेच. तसेच खेड्यापाड्यामध्ये फळे आणि भाज्यांची उपलब्धता अधिक असते. त्यामुळे आहारामध्ये आरोग्यपूर्ण घटकांचा समावेश अधिक असेल, असा काही अंदाज लावणे मात्र चुकीचे असल्याचे समोर आले आहे. 

उपलब्धता असली तरीही हे आरोग्यपूर्ण घटक माणसांच्या प्रत्यक्ष ताटांपर्यंत पोचत नसल्याचेच वास्तव आहे. हे केवळ भारतात नाही, तर अमेरिकेसारख्या विकसित देशामध्ये हेच घडत असल्याचे दिसून आले आहे. मोंटाना राज्य विद्यापीठातील संशोधिका सेलेना अहमड यांनी खाद्य पर्यावरण आणि ते खाण्याची इच्छा यांचा वेध घेण्यासाठी प्रोड्यूस डिझारॅबिलिटी टूल (ProDes) चा वापर केला. त्यातून ग्रामीण भागामध्ये हे पदार्थ खाण्याची इच्छाच कमी असल्याचा निष्कर्ष काढला आहे. त्याचप्रमाणे फूड डेझर्ट म्हणजेच दर्जेदार आहार परवडणाऱ्या किमतीमध्ये उपलब्धता नसणारेही अनेक विभाग आढळले.  ग्रामीण भागातील दुकानांमध्ये ताजी फळे आणि भाज्यांचा दर्जाही शहरी भागांच्या तुलनेमध्ये कमी आढळला आहे.

Web Title: agrowon news vegetables