ढगाळ वातावरणात करा द्राक्ष वेलींचे योग्य व्यवस्थापन

डॉ. आर. जी. सोमकुंवर
मंगळवार, 30 मे 2017

द्राक्षबागेत येत्या आठवड्यात कमी-जास्त प्रमाणात पाऊस व ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. अशा परिस्थितीत बागेत सध्या वेगवेगळ्या वाढीच्या अवस्थेत असलेल्या वेलींचे व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.

नवीन बाग 
नवीन बागेत सध्या ओलांडा तयार होत आहे. लवकर री-कट केलेल्या बागेस आता ओलांड्याचा पहिला टप्पा तयार झाला असावा. या बागेत सध्या मालकाडी तयार होत असून जर या वेळी पाऊस पडल्यास काडीमध्ये होत असलेली घडनिर्मितीकरिता अडचण  येण्याची संभावना जास्त राहील. यावर उपाययोजना म्हणून वेलीचा वाढीचा जोम नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे.

द्राक्षबागेत येत्या आठवड्यात कमी-जास्त प्रमाणात पाऊस व ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. अशा परिस्थितीत बागेत सध्या वेगवेगळ्या वाढीच्या अवस्थेत असलेल्या वेलींचे व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.

नवीन बाग 
नवीन बागेत सध्या ओलांडा तयार होत आहे. लवकर री-कट केलेल्या बागेस आता ओलांड्याचा पहिला टप्पा तयार झाला असावा. या बागेत सध्या मालकाडी तयार होत असून जर या वेळी पाऊस पडल्यास काडीमध्ये होत असलेली घडनिर्मितीकरिता अडचण  येण्याची संभावना जास्त राहील. यावर उपाययोजना म्हणून वेलीचा वाढीचा जोम नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे.

बागेत ही परिस्थिती असल्यास ०ः५२ः३४  तीन ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून गरजेनुसार २ ते ३ फवारण्या कराव्यात. याचसोबत बागेत शेंडा पिंचिंगसुद्धा महत्त्वाचे असेल. असे केल्यास वाढ नियंत्रणात ठेवून घडनिर्मिती सुद्धा व्यवस्थितरीत्या होईल.

दुसऱ्या परिस्थितीमध्ये बागेत ओलांड्याचा पहिला टप्पा संपून जर ओलांड्यावर काडी तयार झाली किंवा तळापासून दुधाळ रंगाची झाली असल्यास अशा परिस्थितीमध्ये सध्याच्या वातावरणाचा फायदा घेऊन ओलांड्याचा दुसरा टप्पा पूर्ण करावा. म्हणजेच, पुढील काळात पाऊस पूर्णपणे सुरू होण्यापूर्वीच काडी तयार करता येईल. या वेळी बागेत १२ः६१ः० ची फवारणी आणि जमिनीतून उपलब्धता करावी. 

बगलफुटींची वाढ जोमात होणे ः
बागेतील तापमानात जास्त प्रमाणात वाढ झालेली दिसून येते; परंतु येत्या काळात जर काही बागांमध्ये पाऊस झाल्यास बगलफुटींची वाढ जास्त प्रमाणात होण्याची संभावना असेल. 

बागेत सबकेन होऊन आपण फक्त एकच बगलफूट राखतो; परंतु या वातावरणात तळापर्यंत बगलफुटी वाढताना दिसून येतील. सध्या पाने जुनी होत असल्याचा अनुभव येईल.

बागेत ढगाळ वातावरण व जुनी होत असलेले पाने ही परिस्थिती दाट कॅनॉमीमध्ये दमटपणा निर्माण करेल व त्याचाच परिणाम म्हणजे भुरी रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होण्याची जास्त संभावना असेल.

यावर उपाययोजना म्हणजे बगलफुटी वेळेवर काढून टाकाव्यात. ३ ग्रॅम प्रती लिटर प्रमाणे पालाशची फवारणी किंवा एकरी १० किलो या प्रमाणे जमिनीतून पूर्तता करावी म्हणजे काडी लवकर परिपक्व होईल. अशा प्रकारच्या काडीवर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी असते. 

डॉ. आर. जी. सोमकुंवर,  ०२०-२६९५६०६०
 (राष्टीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

द्राक्षबागेतील वेली सुकणे 
या वर्षी बऱ्याच बागांमध्ये अचानक द्राक्षवेल सुकण्याची समस्या जास्त प्रमाणात दिसून येत आहे. ही परिस्थिती विशेष म्हणजे रि-कट घेतल्यानंतर पहिल्या वर्षाच्या बागेत दिसून येते.

काही बागांत जमिनीतील खोदल्यानंतर मुळी काळी पडलेली दिसेल. या मुळीवरून तयार होणारी पांढरी मुळी दिसत नाही. ही परिस्थिती काही अंशी हलक्या जमिनीत जास्त प्रमाणात दिसते. भारी जमिनीत सुद्धा द्राक्षवेली सुकताना दिसतील. भारी जमिनीत सुद्धा पुरेसे पाणी असूनसुद्धा मुळी काळी पडलेली दिसेल.

वेलीवर काही विपरीत परिस्थितीमुळे ताण बसला असावा किंवा मुळांवर बुरशीचा प्रादुर्भाव झालेला असावा. यावर उपाययोजना करण्यासाठी ट्रायकोडर्मा या बुरशीजन्य घटकाचे ( ५ मि.लि. प्रति लिटर पाणी) १ ते २ वेळा ड्रेंचिंग करावे. सुरुवातीच्या काळात वरील उपाययोजना करून नियंत्रण ठेवता येईल. त्यानंतर ट्रायकोडर्माचे ड्रेचिंग पुढील काळात मदत करेल.

Web Title: agrowon weather grapes