प्रयोगातून फुलवली केळीची बाग

मनोहर घोळसे : सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

सावनेर - कधी पावसाचा दुष्काळ, तर कधी अति पाऊस पडला की पिकांचे नुकसान होते. यानंतर शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होते. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती न करता नवनव्या पिकांचा प्रयोग करणे गरजेचे आहे. असाच प्रयोग मानेगाव येथील प्रगतिशील शेतकरी बंडू ऊर्फ गुणवंत चौधरी यांनी केला. यात त्यांना यशही आले.

चौधरी यांनी नऊ एकर जागेत केळीची बाग फुलविली व ११ एकर जागेत तुरीच्या नऊ फूट अंतरावरील आंतरपिकात अद्रक व हळदीचे पीक घेतले. त्यांची ही किमया बघण्यासाठी परिसरातीलच नव्हे, तर दूरदूरचे शेतकरी येत आहेत. चौधरी यांनी शेतीविषयक माहिती, मेळावे, प्रशिक्षण वर्ग, ॲग्रोवनचे वाचन करून ही किमया केली. त्यामुळे ते अन्य शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरले आहेत. त्यांना शेतकऱ्यांविषयी प्रेम, समाजकार्य व राजकारणात आवड आहे. त्यामुळे ते कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नि:शुल्क माती परीक्षणाचा उपक्रम राबवितात. चौधरी यांच्या शेतकरी मित्रांनी असाच उपक्रम शेतात राबविला. यात प्रेमचंद सावजी, रामू रहाटे, हेमराज रहाटे, अशोक निंबाळकर, सुभाष तऱ्हाने, मनोज कुहिटे पाटील यांचा समावेश आहे.

शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम राबविणार
तुरीचे नवीन प्रजातीचे बियाणे उत्पादनास कसे योग्य आहे. उभ्या पिकांची पाहणी करण्यासाठी लवकरच तीन हजार शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम आयोजित करणार आहे असे चौधरी यांनी  सांगितले. शासनाकडून ठरविण्यात आलेल्या हमीभावानुसार मालाला बाजारपेठ नसल्याने गुणवंत चौधरी यांनी खंतही व्यक्त केली.

Web Title: banana garden