बीडच्या ‘मार्केट ऑन व्हील’ मॉडेलची देशपातळीवर दखल   

प्रतिनिधी
Wednesday, 17 June 2020

शेतकरी उत्पादक कंपन्या व शेतकरी गटाच्या माध्यमातून ‘मार्केट ऑन व्हील’ मॉडेल प्रत्यक्षात आले. कंपन्या व गटांनी नेमून दिलेल्या प्रभागात फिरत्या वाहनातून भाजीपाला-फळे विक्री करण्याचे नियोजन केले.

अंबाजोगाई, जि. बीड - लॉकडाउनमध्ये बीड जिल्ह्यात भाजीपाला व फळे विक्रीसाठी शेतकरी उत्पादक कंपन्या व शेतकरी गटाच्या माध्यमातून निर्माण केलेल्या ‘मार्केट ऑन व्हील’ (फिरते भाजीपाला-फळे विक्री वाहन) मॉडेलची दखल देशपातळीवर घेतली गेली आहे. कृषी विस्तार विभाग, भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर), नवी दिल्ली यांनी नुकतेच ‘कोविड-१९ काळातील नावीन्यपूर्ण कृषी समाधान’ नावाने ई-पुस्तक प्रकाशित केले आहे. या पुस्तकात ‘समन्वय साखळीतून जीवनमानाला शाश्वतता’ मथळ्याखाली बीड जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या ‘मार्केट ऑन व्हील’ मॉडेलला महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. 

लॉकडाउन काळात कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मोठी खबरदारी घेण्यात आली होती. शेतकरी व ग्राहक यांच्या सुरक्षेसाठी गर्दी टाळणे अनिवार्य होते. शेतकऱ्यांच्या शेतमालाची नासाडी टाळणे, ग्राहकांना सुरळीत पुरवठा करणे व गर्दी टाळणे, असे आवाहन होते. कृषी विज्ञान केंद्र, अंबाजोगाई, कृषी विभाग, बीड, आत्मा, बीड, सर्व नगर परिषद, जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन यांच्या समन्वयातून ‘मार्केट ऑन व्हील’ (फिरते भाजीपाला-फळे विक्री वाहन) मॉडेल जिल्ह्यात राबविण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    

केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर, केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी, ‘आयसीएआर’चे महासंचालक डॉ. टी. मोहपात्र, उप महासंचालक डॉ. ए.के. सिंह यांनी अभिनव उपक्रमाबद्दल कृषी विज्ञान केंद्राचे कौतुक केले आहे. शेतकरी उत्पादक कंपन्या व शेतकरी गटाच्या माध्यमातून ‘मार्केट ऑन व्हील’ मॉडेल प्रत्यक्षात आले. शेतकरी कंपन्या व गटांना तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून तात्पुरते विक्री परवाने देण्यात आले. कंपन्या व गटांनी नेमून दिलेल्या प्रभागात फिरत्या वाहनातून भाजीपाला-फळे विक्री करण्याचे नियोजन केले. 

शेतीविषयी बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

दरही निश्‍चित करण्यात आले
कृषिमालाचा दर ठरविण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ व सर्व तालुका कृषी अधिकारी यांनी मागणी व पुरवठ्याचा अभ्यास करून नियमित दर निश्चित केला. समाजमाध्यमांचा वापर करण्यात आला. भाजीपाला-फळे उत्पादक शेतकरी व विपणन करणारे शेतकरी गट यांचा सामाजमाध्यमातून समन्वय साधण्यात आला. कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ, कृषी विभाग व आत्मा विभागाचे अधिकारी नियमित विक्री वाहनाला भेटी देऊन समस्यांचे निराकरण, अंतर राखण्यास सूचना करत होते. निर्धारीत दरानुसार विक्री होते आहे, याची खात्री केली जात होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beed's market-on-wheel model has gained national attention

Tags
टॉपिकस
Topic Tags: