चास परिसरातील पिके पाण्याखाली 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 14 July 2019

महाळुंगे पडवळ, जि. पुणे  - आंबेगाव तालुक्‍यात सात ते आठ दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसाने चास, साकोरे, महाळुंगे पडवळ, कळंब येथील सखल भागातील शेतीला तळ्याचे स्वरूप आले आहे. 

सरीवर सरी कोसळत असल्याने सखल भागातील पिके पाण्याखाली गेली आहेत. पिकांमधील पाणी काढण्यासाठी शेतकरी धावपळ करत आहेत. 

आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असल्यामुळे घोडनदीला पाणी आले आहे. त्यामुळे ठाकर समाजाच्या लोकांची नदीकाठी खेकडे व मासे पकडण्यासाठी गर्दी वाढली आहे. नजीकच्या काळात पावसाचा जोर वाढल्यास घोडनदीला पूर येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे घोडनदीच्या तिरावर महिला व नागरिकांनी जावू नये, असे आवाहन आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या सभापती उषा कानडे यांनी केले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crop under water in chas