सोयाबीनमध्ये तेजी, मक्याची मागणी वाढती

corn
corn

या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने खरीप मका, बासमती तांदूळ व सोयाबीन यांच्यात वाढ झाली. इतरांच्या किमती उतरल्या. सध्याच्या स्पॉट किमतीच्या तुलनेत इतर सर्व पिकांच्या मार्च/एप्रिलमधील फ्युचर्स किमतीत वाढ दिसून येत आहे.

मका 
खरीप मक्यामध्ये अजून व्यवहार होत नाहीत. मक्याच्या (जानेवारी २०२०) किमती नोव्हेंबर महिन्यात उतरत होत्या (रु. २,०७० ते रु. १,८५८). या सप्ताहात त्या २.७ टक्क्यांनी वाढून रु. २,०३६ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (सांगली) रु. २,०२३ वर आल्या आहेत. या वर्षीचा हमीभाव रु. १,७६० आहे. मक्याची मागणी वाढती आहे. 

आता खरीप पिकाची आवक सुरू झाली आहे. खरीप पिकाच्या उत्पादनात जरी घट अपेक्षित असली तरी रब्बी उत्पादन चांगले येईल अशी अपेक्षा आहे. गेल्या सप्ताहातील एनसीडीएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढ-उतार खालीलप्रमाणे होते.

सोयाबीन  
सोयाबीन फ्युचर्स (जानेवारी २०२०) किमती १८ नोव्हेंबरपासून वाढत आहेत. (रु. ३,९७४ ते रु. ४,१००). या सप्ताहातसुद्धा त्या १.३ टक्क्यांनी वाढून रु. ४,१८८ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती २ टक्क्यांनी वाढून रु. ४,१७१ वर आल्या आहेत. नवीन वर्षासाठी हमीभाव रु. ३,७१० आहे. मार्च डिलिव्हरीसाठी रु. ४,२५० भाव आहे. सोयाबीनमधील तेजी अजून कायम राहण्याची शक्यता आहे. 

हळद 
हळदीच्या फ्युचर्स (जानेवारी २०२०) किमती नोव्हेंबरमध्ये उतरत होत्या. (रु. ६,५६८ ते रु. ६,०६८). या सप्ताहात त्या ०.८ टक्क्यांनी घसरून रु. ५,९४२ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ५,८६५ वर आल्या आहेत. मेच्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने १.५ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ५,९५४).  

गहू 
गव्हाच्या (जानेवारी २०२०) किमती ८ नोव्हेंबरपासून उतरत आहेत. (रु. २,२१४ ते रु. २,१४५). या सप्ताहातसुद्धा त्या ०.३ टक्क्यांनी उतरून रु. २,१४१ वर आल्या आहेत. स्पॉट (कोटा) किमती रु. २,१२७ वर आल्या आहेत. मेच्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा १.६ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २,१६१).  

गवार बी
गवार बीच्या फ्युचर्स (जानेवारी २०२०) किमती १५ नोव्हेंबरपासून उतरत आहेत (रु. ४,४३५ ते रु. ४,१३०). या सप्ताहातसुद्धा त्या २.५ टक्क्यांनी घसरून रु. ३,९५० वर आल्या आहेत.  स्पॉट (जोधपूर) किमती रु. ३,९२० वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा मार्चमधील फ्युचर्स किमती ३.३ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,०५०). 

हरभरा
हरभऱ्याच्या फ्युचर्स (मार्च २०२०) किमती १४ नोव्हेंबरनंतर घसरत आहेत. (रु. ४,५५४ ते रु. ४,३७३). या सप्ताहातसुद्धा त्या १.८ टक्क्यांनी घसरून रु. ४,४०० वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,२६१ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (बिकानेर) किमतींपेक्षा एप्रिलमधील फ्युचर्स किमती १.७ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,३३५).  

कापूस 
एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (जानेवारी २०२०) किमती ११ नोव्हेंबरनंतर वाढत आहेत. (रु. १८,९८० ते रु. १९,४८०). या सप्ताहात त्या रु. १९,२२० वर स्थिर आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. १८,६६७ वर आल्या आहेत. मार्चच्या फ्युचर्स किमती रु. १९,७०० वर आलेल्या आहेत. त्या सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ५.५ टक्क्यांनी अधिक आहेत. 

मूग
मुगात अजून व्यवहार होत नाहीत. स्पॉट (मेरता) किमती १.१ टक्क्यांनी घसरून रु. ६,६४९ वर आल्या आहेत. मार्च फ्युचर्स किमती रु. ६,९४५ वर आल्या आहेत. मुगाचे हमीभाव रु. ७,०५० आहेत. 

बासमती तांदूळ 
बासमती तांदळामध्ये अजून व्यवहार होत नाहीत. स्पॉट (कर्नाल) किमती रु. ३,२०० वर आल्या आहेत.  

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति १७० किलोची गाठ).        
arun.cqr@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com