हमखास उत्पन्न देणाऱ्या सहा कोंबड्या विकसित - डॉ. सॅम लुड्रिक्‍स

हमखास उत्पन्न देणाऱ्या सहा कोंबड्या विकसित - डॉ. सॅम लुड्रिक्‍स

कोल्हापूर - केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यातून शेतीपूरक उद्योगांना चालना देण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून येथील मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्राने ‘सधन कुक्कुट पालन’ योजनेत त्यासाठी सहा प्रकारच्या कोंबड्या विकसित केल्या आहेत. ‘गिरीराज’, ‘ब्लॅक ॲस्ट्रोलॉप’, ‘आरआयआर’, ‘कावेरी’, ‘ग्रामप्रिया’, ‘हरीप्रिया’ अशी त्यांची नावे. त्यांची अंडी किंवा पिल्ले घेऊन भविष्यात घरबसल्या घरगुती कोंबड्या किंवा अंडी विक्रीचा व्यवसाय करता येणार आहे, अशी माहिती पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सॅम लुड्रिक्‍स यांनी दिली. 

मांसाहार करणाऱ्यांच्या मते, गावठी कोंबड्या जास्त चवीला असतात. त्यामुळे गावठी कोंबड्यांची मागणी वाढत असून गावागावात असा व्यवसाय आढळतो. त्यामुळे कुक्‍कुटपालनात गावठी कोंबड्या पालन व्यवसाय प्रथम स्तरावर मानला जातो. तरीही फारसा अार्थिक लाभ समाधानकारक नाही.

कोंबडीचे वजन जास्त भरत नाही, अंडी उत्पादन कमी असते. आदी कारणांमुळे गावठी कोंबड्यांचा पालन व्यवसाय घरापुरता मर्यादित आहे. याची दखल घेत मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्राने सधन कुक्कुट पालन योजनेअंर्तगत गावठी व संकरित अशा प्रक्रियेतून पाच वेगवेगळ्या जातीच्या कोंबड्या विकसित केल्या आहेत. यात कोंबडी वजनदार असेल व अंडी देण्याची क्षमताही जास्त असेल. अशा कोंबडीची अंडी जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचवली जात आहेत. आर्थिक नफा व व्यवसायवृद्धी हा त्यामागे हेतू आहे. त्यादृष्टीने केंद्र शेतकऱ्यांना प्रशिक्षण देत आहे. 

‘गिरीराज’ चर्चेत
घरबसल्या शंभर कोंबड्या पाळल्या तरी दिवसाला ४०० ते ७०० रुपये केवळ अंड्यातून मिळतील. सध्या सर्वांत जास्त चर्चेत असलेली कोंबडी म्हणजे ‘गिरीराज’. तिच्या अंड्याचे वजन ५५ ग्रॅम आहे. साडेतीन किलो वजनाची कोंबडी असते. मांसाचे उत्पादन ७४ टक्के असते. अंडी खाण्यासाठी चविष्ठ मानली जातात. त्याला भावही ५ ते ८ रुपयांपर्यंत असतो. कोंबडीच्या मांसाचा दर ३५० रुपये एक किलो असा आहे. तर एक गिरीराज कोंबडी किमान १८० अंडी देते. त्यातून किमान ९०० रुपयांचे उत्पन्न मिळते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com