‘हिराई’ने आणली हिरवाई...;भाजीपाला उत्पादन ते विक्रीत महत्वाचा दुवा

‘हिराई’ने आणली हिरवाई...;भाजीपाला उत्पादन ते विक्रीत महत्वाचा दुवा

नाशिक जिल्ह्यातील उमराणे (ता. देवळा) येथील काही प्रयोगशील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हिराई शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली. त्या अंतर्गत परिसरातील शेतकऱ्यांना भाजीपाला उत्पादनासह विक्रीच्या सुविधा पोचवण्यासाठी संकलन, खरेदी केंद्र आदी सुविधा उभारल्या. त्याद्वारे कंपनी शेतकरी व व्यापारी यांच्यामध्ये मोलाचा दुवा ठरली आहे. 

नाशिक जिल्ह्यातील उमराणे (ता. देवळा) गाव परिसरातील काही प्रयोगशील शेतकऱ्यांनी हिराई शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली. परिसरात अल्प क्षेत्रावर मिश्र पद्धतीने भाजीपाला लागवडी घेऊन उत्पादनवाढीचे उद्दिष्ट कंपनीने ठेवले. थेट बांधावर मोबाईल व्हॅनद्वारे शेतीमाल संकलनासाठी उपलब्ध झाली. कृषी विभाग-‘आत्मा’ यांचे शास्त्रीय मार्गदर्शन कंपनीला होऊ लागले. शेतकरी प्रयोगशील झाले. भाजीपाला क्षेत्र व उत्पादनात वाढ होऊ लागली.   

भाजीपाला खरेदी व संकलन केंद्र 
सुरुवातीला मनमाड, नाशिक, चांदवड असे भाजीपाला विक्रीचे पर्याय होते. शेतकरी कंपनीने पारदर्शक अशी विक्रीची व्यवस्था उभारली. त्या अंतर्गत भाजीपाला खरेदी व संकलन केंद्र सुरू केले. त्यातून शेतकरी अन व्यापारी यात समन्वय साधला गेला. देवळा तालुका ‘आत्मा’ गट तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश देवरे यांनी त्यासाठी सहकार्य केले. 

दृष्टिक्षेपात शेतकरी उत्पादक कंपनीचे कार्य 
संचालक संख्या- १० 
सभासद संख्या- ३११ 

भाजीपाला आवक- ७ ते ८ टन
उत्पादित भाजीपाला- मिरची, टोमॅटो, वाल, काकडी, भेंडी, वांगी, सिमला मिरची, कोबी, फ्लॉवर, शेवगा गिलके, दोडके, डांगर, घेवडा, गाजर, मूग, शेवगा, पालक, बीटरूट, आले, आदी.

शेतकऱ्यांसाठी सुविधा 
प्रशस्त शेतीमाल खरेदी आवार
स्वतंत्र शेतीमाल मोजणी सुविधा
केंद्रात शेतमाल हाताळणीसाठी कर्मचारी सुविधा
शेतीमाल विक्रीनंतर रोख ‘पेमेंट’

आणखी बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

कंपनीचे सभासद व अन्य मिळून शंभर ते दीडशे शेतकरी शेतीमाल विक्रीसाठी येऊन घेतात. सुमारे १५ व्यापारी असतात. त्यामुळे खरेदीत स्पर्धा होते. प्रतिकिलो प्रमाणे व्यवहार होतो. एक तासाच्या आत रोख पेमेंट होते. शेतकरी हिताच्या दृष्टीने आमचे प्रयत्न यशस्वी होत आहेत. 
-धर्मा पांडुरंग देवरे, अध्यक्ष, हिराई शेतकरी उत्पादक कंपनी, उमराणे. 
९९६०४६४४४९

शेतकरी कंपनी स्थापन झाल्यानंतर उत्पादन ते विपणन ही साखळी उभी करणे, सभासदांच्या प्रगतीसाठी नव्या संकल्पना नावारूपाला आणणे यामध्ये हिराई कंपनी प्रयत्नशील आहे. भागभांडवल मर्यादित असूनही असे प्रयोग शेतकऱ्यांना बळकटी देणारे ठरणारे आहेत. 
- राजेंद्र निकम,  प्रकल्प संचालक-आत्मा, नाशिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com