सोलापुरात टोमॅटो, वांगी, हिरव्या मिरचीला उठाव

सुदर्शन सुतार
मंगळवार, 7 जुलै 2020

वांग्यांना प्रतिक्विंटलाला किमान १००० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये दर मिळाला. हिरव्या मिरचीला किमान १००० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये असा दर मिळाला.

सोलापूर - सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात टोमॅटो, वांगी, हिरव्या मिरचीची आवक कमी राहिली. पण, मागणी असल्याने  चांगला उठाव मिळाला. त्याशिवाय मेथी, कोथिंबिरीचे दरही तेजीत राहिले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

बाजार समितीत आद्यापही शेतकरी ते ग्राहक अशी विक्री सुरू आहे. गतसप्ताहात रोज वांग्यांची ३० ते ५० क्विंटलपर्यंत आणि हिरव्या मिरचीची १० ते १५ क्विंटलपर्यंत आवक झाली. त्यांची सर्व आवक स्थानिक भागातूनच झाली. वांग्यांना प्रतिक्विंटलाला किमान १००० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये दर मिळाला. हिरव्या मिरचीला किमान १००० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय टोमॅटो, दोडका यांचे दरही काहीसे तेजीत राहिले. टोमॅटोला किमान १५०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ३५०० रुपये, तर दोडक्याला किमान ७०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक १८०० रुपये असा दर मिळाला. 

शेती उत्पन्नावर अवलंबून न राहता तब्बल २७ वर्षांपासून 'या' व्यवसायात.. 

भाज्यांमध्ये मेथी, कोथिंबीर आणि शेपूला उठाव मिळाला. त्यांची आवकही रोज प्रत्येकी ५ ते ७ हजार पेंढ्यांपर्यंत झाली. मेथीला शंभर पेंढ्यांसाठी ६०० ते १५०० रुपये, कोथिंबिरीला ८०० ते १२०० रुपये आणि शेपूला ५०० ते ८०० रुपये दर मिळाला. कांद्यांची आवक आणि लिलाव सप्ताहातून फक्त सोमवार आणि गुरुवार दोनच दिवस होतात. त्यातही कांद्याची आवक तुलनेने कमीच आहे. कांद्यांना प्रतिक्विंटलला किमान २०० रुपये, सरासरी ७०० रुपये आणि सर्वाधिक १००० रुपये असा दर मिळाला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good rate for tomatoes, brinjal, green chillies in Solapur