कपाशी पिकावर पाण्याअभावी ताण वाढला 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 ऑगस्ट 2018

सोयगाव - तालुक्‍यात पावसाचा खंड पडून महिना झालेला असताना शेतकऱ्यांनी विहिरीतील जेमतेम पाण्यावर पिकांची वाढ करून संगोपन केले; परंतु विहिरीतील जलसाठाही जवळपास संपल्याने ताण वाढल्यामुळे हजारो हेक्‍टरवरील कपाशीची पिके धोक्‍यात आली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

पावसाळ्याच्या सुरवातीपासून सोयगावला केवळ सरासरी २१४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने सोयगाव तालुक्‍यात दडी मारल्याने खरिपाच्या पिकांवरील ताण वाढत पिके मलूल होत आहेत. 

शेतकऱ्यांनी ठिबकवरील पिकांची वाढ केली. त्यातच विहिरीतील जलसाठा जेमतेम झाल्याने पुन्हा पिकांना पाण्याची चिंता भेडसावत असल्याचे चित्र तालुक्‍यात निर्माण झाले आहे. 

खरिपाच्या हंगामात ३२ हजार हेक्‍टरवरील कपाशीची लागवड करण्यात आली आहे. त्यापैकी २० हजार हेक्‍टरवरील कपाशीची पिके पाण्याअभावी अडचणीत आली असताना दुसरीकडे विहिरीचा साठाही कोरडाठाक झाल्याने ऐन पावसाळ्यात पिकांना टॅंकरद्वारे पाण्याचा पुरवठा करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. कपाशी पाठोपाठ दुसऱ्या स्थानावर असलेल्या मक्‍याची स्थिती चिंताजनक झाली असल्याने तालुक्‍यात मक्‍याचे पीक वाळत आहे. अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने ६२०० हेक्‍टरवरील मक्‍याची पिके करपली आहेत. सोयाबीनची स्थिती अतिशय चिंताजनक झाली आहे. 

कपाशीची फुलेही करपली
दरम्यान, पाऊस नसल्याने आणि विहिरीतील पाण्यावर वाढीस लावलेल्या कपाशीची स्थिती आता फुलावर आली आहे. ऐन फुलावर आलेल्या कपाशीला पाणी नसल्याने लागलेली फुले करपून गळत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. दरम्यान, तालुक्‍यात खरिपाच्या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी होत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lack of water on cotton crop

टॅग्स