'थाई' प्रजातीच्या पेरु उत्पादनातून लाखोंची कमाई

दिगंबर पाटोळे
गुरुवार, 28 मार्च 2019

वणी (नाशिक) : निसर्गाची वारंवार शेतकऱ्यांना हुलकावणी, शेतमालाला मिळणारा अल्पभाव यामूळे शेतकरी आता पारंपारिक शेतीला फाटा देत आधुनिक शेतीकडे वळले आहे. तालुक्यातील माळेदुमाळा येथील पाच शेतकऱ्यांनी थाई प्रजातीच्या पेरूची लागवड करुन लाखोंची कमाई केली आहे.

वणी (नाशिक) : निसर्गाची वारंवार शेतकऱ्यांना हुलकावणी, शेतमालाला मिळणारा अल्पभाव यामूळे शेतकरी आता पारंपारिक शेतीला फाटा देत आधुनिक शेतीकडे वळले आहे. तालुक्यातील माळेदुमाळा येथील पाच शेतकऱ्यांनी थाई प्रजातीच्या पेरूची लागवड करुन लाखोंची कमाई केली आहे.

दिंडोरी तालुका हा धरणांचा तालुका बरोबरच द्राक्ष पंढरी म्हणून ओळखली जावू लागली असून बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करु ऑनलाईन खरेदीत अव्वल असलेला दिंडोरी तालुक्याती युवा शेतकरी आता पारंपारीक शेतीला फाटा देवून शेतीत नवनवीन प्रयोग राबवू लागले आहे. तालुक्यातील माळेदुमाळा येथील संपत वाघ, सुनिल कोऱ्हाळे, कचरु गायकवाड, संतोष भागवत, बाळासाहेब वाघ यांनी माळेदुमाला परीसरातील आपल्या शेतात तीन वर्षांपूर्वी 'थाई' प्रजातीच्या पेरुची लागवड केली असून दोन वर्षात प्रत्येकाने दोन ते पाच लाखापर्यंत उत्पन्न घेतले आहे. द्राक्ष बागे पेक्षा अतिशय कमी खर्चीक व मनुष्यबळही कमी लागणारे पेरुचे हे प्रजात द्राक्ष बागेपेक्षा दुपटीने उत्पन्न मिळून दिल्याने या पेरु उत्पादक शेतकरी आता थाई पेरुचे दर्जेदार उत्पादन करण्यासाठी विशेष लक्ष देवू लागली आहे. थाई पेरुचे बाग लावण्याचा माळेदुमाला येथील हा तालुक्यातील पहिलाच प्रयोग असून तो यशस्वी झाल्याने परीसरातील शेतकरीही या पेरुचे लागवड करण्याची माहिती करुन घेवून तयारी करीत आहे.

थाई पेरुची लागवड (एकरी) :  अंतर - दोन ओळी मधील अंतर १२ फुट, दोन झाडांमधील अंतर ८ फुट
एकरी रोप :  ४५० रोपे प्रत्येक रोपाची किमंत १५० रु.
ड्रीप :  इनलाईन प्रत्येक झाडाला दोन नळी

लागवडीसाठी प्रांरभिक खर्च  : रोपे  ६७,५०० रुपये, ड्रीप १२,००० रुपये, खते १०,००० - पहिला हंगाम :  १२ ते २४ महीने. या कालावधीत १ झाड सरासरी २५ किलो फळ देते.
- दुसरा हंगाम :  २५ ते ३६ महिने. या कालावधीत एक झाड सरासरी ५० ते ६० किलो फळ देते.
- तिसरा हंगाम :  ३७ महिन्यानंतर एक झाड सरासरी १०० किलोच्या वरती फळ देते. फळ पक्व होण्याचा कालावधी हा कळी ते तोडणी पर्यंत तीन ते साडेतीन महिन्याचा असतो. 

झाडासाठी पोटॅश, कॅल्शीयम, मायक्रोन्युबची आवश्यकता असते. पाणी द्राक्षबागेपेक्षा कमी म्हणजे वाफसा पध्दतीने द्यावे लागते. झाडावर सर्वसाधरण थ्रीप्स, भुरी व मिलीबग रोग येतात. झाडांना विशिष्ट प्रकारची छाटणी आवश्यक असते. छाटणी केव्हाही करु शकतो. फळांना सनबर्निंग पासून संरक्षणासाठी पॉलीथीन बॅगची आवश्यकता असते. १ बॅगची किमंत ३ रुपया पर्यंत असून बॅग चार ते पाच वेळा वापरता येते. तसेच फ्रुटनेटचाही वापर केला जातो, त्याची किमंत १.५० पैशांपर्यंत असून एकदाच वापरता येते. हंगाम वर्षातून दोनदा किंवा वर्षभर घेता येतो.  

थाई-पेरु ची वैशिष्टे :- 
१) थाई-पेरु मध्ये बियाचे प्रमाण खूप कमी राहते व बिया नरम असतात.
२) थाई-पेरु रोजच्या दैनंदिन जिवनात व प्रक्रिया उद्योगा मध्ये खूप मोठया प्रमाणात मागणी आहे. 
३) भारता मध्ये आंबा, केळी नंतर महत्वचेे तीसरे फळ  
४) थाई-पेरु चे वरील आवरण जाड  असल्या मुळे १० ते १५ दिवस फळ टिकुन राहु शकतेे.
५) थाई-पेरु मध्ये गराचे चे प्रमाण जास्त राहते. व चवीला अतिशय गोड राहते.
६) थाई-पेरूच्या च्या झाडाचे आयुष्यमान अठरा ते बावीस वर्ष 
७) एका फळाचे वजन सर्वसाधरण ७०० ग्रॅम ते १ किलोवरही असते. 

दरम्यान माळेदुमालाच्या या शेतकऱ्यांनी थाई पेरुची विक्री ही सुरत, बडोदा येथे केलेली असून मुंबई, पुणे, अहमदाबाद, दिल्ली येथेही मोठी मागणी असल्याचे सांगत आता पर्यंत किमीत कमी ६० रुपये व जास्तीत जास्त १३० रुपये प्रतीकिलो भाव मिळाल्याचे सांगितले. सदरचे पेरुची रोपे ही भराडीया, ता. वालिया, जि. भरुच (गुजरात) येथून जार्वी नर्सरीतून आणली असून तीची शाखा माळेदुमाला येथेही सुरु केल्याचे सांगितले. झाडांची लागवड केल्यापासून दोन वर्षांपर्यंत नर्सरीच्या तज्ञांकडून शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन मिळत असून चांगला भाव मिळण्यासाठी मार्केटची माहीती वेळोवेळी शेतकऱ्यांना दिली जात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

मी तीन वर्षांपूर्वी थाई पेरुची २ एकरात लागवड केलेली आहे. द्राक्षबागेच्या वार्षिक खर्च, मनुष्य बळ अतिशय कमी लागत असल्याने व जादा उत्पन्न मिळू लागल्याने मी आता द्राक्षबागे एैवजी पेरु बागेकडे अधिक लक्ष देवून उत्पादन घेत आहे..
- सुनिल कोऱ्हाळे, माळेदुमाला

शेती करतांना उत्पन्न हे बे भरवशाचे वाटत असतांना द्राक्ष शेतीतून फायदा होतांना दिसत नव्हता. तेव्हा वेगळे काही तरी करावे या हेतूने चाचपणी करीत पेरु पिकाची माहिती घेतली. त्यात थाई पेरु योग्य वाटल्याने एप्रिल २०१६ मध्ये १ एकरात थाई पेरुची लागवड केली असून द्राक्ष शेतीच्या तुलनेत २५ टक्के पण खर्च न येता उत्पन्न द्राक्ष शेती एवढे निघाले. दोन वर्षात ५ लाखाचे उत्पन्न मिळाले असून या हंगामात मला खर्च वजा जाता ५ ते ७ लाखांपर्यंत उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा आहे.
- संपत वाघ - उत्पादक व रोप वाटीका संचालक, माळेदुमाळा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lakhs of earnings from Thai' guava