पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात  पावसाच्या हलक्‍या सरी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जुलै 2018

पुणे - गत काही दिवसांत पुणे जिल्ह्यातील अनेक भागांत दमदार पावसाने हजेरी लावली. शनिवारी (ता.७) दिवसभर घाटमाथ्यासह, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात हलक्‍या सरी बरसल्या. पावसामुळे ओढे, नाले खळाळून वाहू लागले असून, धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. पावसाची अशीच स्थिती येत्या आठवडाभर राहिल्यास धरणातील पाणीसाठ्यात चांगली वाढ होण्याची शक्‍यता आहे.

गेल्या महिन्यात पावसाने काहीशी उघडीप दिली होती. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाले होते; परंतु २२ जूनपासून जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाला सुरवात झाली. गेल्या आठवड्यापासून पावसाचा जोर चांगलाच वाढल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. पश्‍चिमेकडील भागात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांनी भात लागवडीला सुरवात केली आहे. चालू आठवड्यात भात लागवडीला आणखी वेग येणार आहे.  हवेली तालुक्‍यात पुणे शहर, केशवनगर, कोथरूड, खडकवासला, थेऊर, उरुळी कांचन, खेड, भोसरी, चिंचवड, कळस, हडपसर या भागात पावसाच्या हलक्‍या सरी बरसल्या. मुळशीतील पौड, घोटावडे, थेरगाव, मुठे, पिरंगुट, भोर तालुक्‍यातील भोलावडे, नसरापूर, किकवी, वेलू, आंबावडे, संगमनेर, निगुडघर, मावळातील तळेगाव, काले, कार्ला, लोणावळा, शिवणे, वेल्हे तालुक्‍यातील पानशेत, विंझर, आंबावणे या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. 

जुन्नर तालुक्‍यातील नारायणगाव, निमुळगाव, बेल्हा, राजुर, डिंगोरे, आपताळे, ओतूर, खेड तालुक्‍यातील वाडा, राजगुरुनगर, कुडे, पाईट, आळंदी, चाकण, पिंपळगाव, कन्हेरसर, कडूस, आंबेगाव तालुक्‍यातील घोडेगाव, आंबेगाव, कळंब, पारगाव, मंचर भागात पावसाच्या अधूनमधून सरी बरसल्या. काही भागात ढगाळ हवामान होते. पूर्वेकडील तालुक्‍यात अजूनही जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे बारामती, शिरूर, इंदापूर, पुरंदर तालुक्‍यात पेरण्या काहीशा खोळंबल्याचे चित्र आहे. शिरूर, बारामती, इंदापूर, पुरंदर, दौंड तालुक्‍यात शनिवारी आणि रविवारी हवामान ढगाळ होते. त्यामुळे या भागातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Light rain in the area of the dam in Pune