राज्यात काकडी प्रतिक्‍विंटल १००० ते ४००० रुपये 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

औरंगाबादेत प्रतिक्‍विंटल १५०० ते २००० रुपये औरंगाबाद  - येथील कृषी उत्पन्न
बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. १७) काकडीची ४७ क्‍विंटल आवक झाली. या काकडीला १५०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. 

औरंगाबादेत प्रतिक्‍विंटल १५०० ते २००० रुपये औरंगाबाद  - येथील कृषी उत्पन्न
बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. १७) काकडीची ४७ क्‍विंटल आवक झाली. या काकडीला १५०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये २४ डिसेंबर २०१८ रोजी ५ क्‍विंटल आवक झालेल्या काकडीला १५०० ते २२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २९ डिसेंबरला ३७ क्‍विंटल आवक झालेल्या काडीचे दर १००० ते १३०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १ जानेवारी २०१९ ला २३ क्‍विंटल आवक झालेल्या काकडीला ८०० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २ जानेवारी रोजी काकडीची आवक १९ क्‍विंटल तर दर १००० ते १६०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ५ जानेवारीला २३ क्‍विंटल आवक झालेल्या काकडीला १००० ते २२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १० जानेवारीला काकडीची आवक ३४ क्‍विंटल तर दर १५०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १३ जानेवारीला ३७ क्‍विंटल आवक झालेल्या काकडीला १५०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १४ जानेवारीला काकडीची ४० क्‍विंटल आवक झाली. या काकडीला १००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १५ जानेवारीला काकडीची आवक ३ क्‍विंटल झाली. या काकडीला २००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. तर १६ जानेवारीला ३ क्‍विंटल आवक झालेल्या काकडीचे दर २००० ते २८०० रूपये प्रतिक्‍विंटलवर पोचले होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

सांगलीत ३०० ते ४०० रुपये प्रतिदहा किलो
येथील शिवाजी मंडईत काकडीची आवक कमी अधिक होते आहे. गुरुवारी (ता. १७) काकडीची ३०० ते ३५० क्रेट (एक क्रेट १५ किलोचे) आवक झाली होती. त्यास प्रतिदहा किलोस ३०० ते ४०० रुपये असा दर होता.

सांगली जिल्ह्यातील वाळवा, मिरज, पलूस तालुक्यातून काकडीची आवक होते. बुधवारी (ता. १६) काकडीची २५० ते ३०० क्रेटची आवक झाली. काकडीस प्रति दहा किलोस २५० ते ३०० रुपये असा दर होता. 

मंगळवारी (ता. १५) काकडीची ३०० ते ४०० क्रेटची आवक झाली. काकडीस प्रति दहा किलोस ३०० ते ४०० रुपये असा दर मिळाला. गत सप्ताहापेक्षा चालू सप्ताहात काकडीची ५० ते ७० क्रेटने आवक कमी झाली आहे. पुढील सप्ताहात काकडीची आवक आणि दर स्थिर राहतील, असा अंदाज व्यापारी वर्गाने व्यक्त केला आहे.

अकोल्यात प्रतिक्विंटल १००० ते १८०० रुपये
 स्थानिक भाजी बाजारात काकडीची अावक एक टनापर्यंत सध्या स्थिर असून, दर एक हजार ते १८०० रुपयांपर्यंत मिळत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. उत्तम दर्जाची काकडी १५०० ते १८०० अाणि दुय्यम प्रतीची काकडी १००० ते १४०० पर्यंत विकत अाहे. 

सध्या थंडीचा जोर वाढलेला असल्याने काकडीची मागणी कमी अाहे. मात्र, येत्या काळात मागणी वाढण्याची तसेच दरांमध्येही अाणखी सुधारणेची शक्यता वर्तविली जात अाहे. सोबतच अाता काकडीची लागवड केली जात असून, अावकही येत्या काळात वाढणार अाहे. या भागात मागील सुमारे २० दिवसांपेक्षा अधिक काळापासून थंडीचा जोर वाढलेला असल्याने काकडीची अावक मंदावलेली अाहे. दररोज ८ ते १० क्विंटलपर्यंत अावक अाहे. अकोला तसेच इतर भागातून ही काकडीची अावक होत अाहे. किरकोळ बाजारात काकडीची विक्री ३० ते ४० रुपये प्रतिकिलो दराने ग्राहकांना केली जात अाहे.

साताऱ्यात प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. १७) काकडीची १२ क्विंटल आवक झाली. काकडीस क्विंटलला १००० ते १५०० असा दर मिळाला आहे. गत सप्ताहाच्या तुलनेत काकडीच्या आवकेत वाढ झाली असल्याची माहिती बाजार समितीच्यी सूत्रांनी दिली आहे. 

कोरेगाव, सातारा, खटाव, फलटण तालुक्यातून काकडीची आवक होत आहे. २७ डिसेंबरला काकडीची १४ क्विंटल आवक झाली होती. काकडीस क्विंटलला १५०० ते २००० असा दर मिळाला होता. सहा जानेवारीसही काकडीस १५०० ते २००० असा दर मिळाला होता. १३ जानेवारी काकडीच्या आवकेत वाढ होऊन क्विंटलला १००० ते १५०० असा दर मिळाला होता. हाच दर गुरुवारी स्थिर राहिला आहे. काकडीची २० ते २५ रुपये किलोप्रमाणे किरकोळ विक्री केली जात आहे.

नागपुरात १२०० रुपये क्‍विंटल
 स्थानिक कळमणा बाजार समितीत काकडीची नियमित आवक होत असून दर सरासरी १२०० रुपये क्‍विंटल आहेत. गेल्या महिनाभरापासून आवक आणि दर स्थिर असल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.

महिन्याच्या सुरवातीला काकडीची १६० क्‍विंटल आवक होती. १००० ते १२०० रुपये क्‍विंटलचा दर होता. त्यानंतरच्या काळात दर कमीत कमी ८०० ते ९०० रुपये आणि जास्तीत जास्त १२०० ते १३०० रुपये क्‍विंटलवर स्थिर होते. आवक देखील १६० क्‍विंटल, १५० क्‍विंटल आणि १३० क्‍विंटल अशी असल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले. किरकोळ बाजारात १७ ते २० रुपये किलो दराने काकडी विकल्या जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra state cucumber Rs. 1000 to Rs. 4000 per quintal