मका, हळद, कापसाचा तेजीकडे कल

Wheat
Wheat

बाजारातील मक्याच्या स्पॉट किमती सध्या हमीभावापेक्षा अधिक आहेत. मागणी चांगली आहे. रब्बी आवकेमुळे किमती उतरतील; पण त्या हमीभावाच्या आसपास राहतील. हळदीच्या जुलै २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने २.८ टक्क्यांनी अधिक आहेत.

देशातील निवडणुकांमधील मतदान सुरू होऊन आता महिना झाला आहे. भारतीय हवामान खात्याने मॉन्सून सरासरी एवढाच होण्याची शक्यता वर्तवली आहे. रब्बीची आवक आता सुरू होत आहे. पुढील महिन्यात ती वाढणार आहे. त्यामुळे यापुढे कापसाखेरीज इतर वस्तूंची मागणी कमी होणार आहे व पुरवठा वाढणार आहे. त्याचा परिणाम यापुढे किमती नरम राहण्यावर होणार आहे. कापसातील तेजी कायम राहण्याची शक्यता आहे. 

या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने गहू वगळता इतर सर्व पिकांचे भाव घसरले. गव्हाची अजून मोठी आवक सुरू झालेली नाही. कापसाच्या किमतींत अजूनही तेजी आहे. गेल्या सप्ताहात त्यांनी उच्चांक गाठला होता. या सप्ताहात भाव काहीसे उतरले आहेत. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यात रब्बी आवकेमुळे मक्याचे भाव घसरतील. इतरांचे मात्र वाढतील.

गेल्या सप्ताहातील एनसीडीईएक्स आणि एमसीएक्समधील किमतीतील चढ-उतार -

मका
रब्बी मक्याच्या (मे २०१९) किमती मार्च महिन्यात वाढत होत्या. (रु. १,५७० ते रु. १,८००).  
या सप्ताहात त्या २.६ टक्क्याने घसरून रु. १,८६१ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (सांगली) रु. १,९८१ वर आल्या आहेत. हमी भाव रु. १,७०० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,४२५ होता)
 बाजारातील स्पॉट किमती सध्या हमी भावापेक्षा अधिक आहेत. मागणी चांगली आहे. रब्बी आवकेमुळे किमती उतरतील; पण त्या हमी भावाच्या आसपास राहतील. 

साखर 
साखरेच्या (मे २०१९) किमती मार्चमध्ये व्यवहार नसल्याने रु. ३,११९ वर स्थिर होत्या. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,१४६ वर आलेल्या आहेत. भारतातील उत्पादन या वर्षी व पुढील वर्षीसुद्धा वाढण्याचा अंदाज आहे.  

सोयाबीन  
सोयाबीन फ्युचर्स (मे २०१९) किमती मार्च महिन्यात रु. ३,६९५ व रु. ३,८२६ या दरम्यान चढ-उतार अनुभवत होत्या. या सप्ताहात त्या रु. ३,७२८ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,८३४ वर आल्या आहेत.  हमी भाव रु. ३,३९९ आहे. (गेल्या वर्षी तो रु. ३,०५० होता). २३ एप्रिल रोजी जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबर डिलिव्हरीसाठी अनुक्रमे रु. ३,७७५, ३,८०७, ३,८४०, ३,८००, ३,५९० व ३,४९३ भाव होते.  

हळद 
हळदीच्या फ्युचर्स (मे २०१९) किमती मार्च महिन्यात घसरत होत्या (रु. ६,४९२ ते रु. ६,०९२). गेल्या सप्ताहात त्या रु. ६,३८० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या रु. ६,३७६ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ६,३८६ वर  आल्या आहेत. जुलै २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने २.८ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ६,५६६). आवक वाढू लागली आहे. या वर्षी उत्पादन वाढलेले असेल. पण मागणीसुद्धा वाढत आहे.

गवार बी 
गवार बीच्या फ्युचर्स (मे २०१९) किमती मार्च महिन्यात वाढत होत्या (रु. ४,२५२ ते रु. ४,४९०). या सप्ताहात त्या ०.३ टक्क्यांनी घसरून रु. ४,३४८ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ४,३७० वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपुर) किमतींपेक्षा जुलै २०१९ मधील फ्युचर्स किमती २.२ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,४६४). खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींवर पुढील घट किंवा वाढ अवलंबून आहे. 

हरभरा 
हरभऱ्याच्या फ्युचर्स (मे २०१९) किमती मार्च महिन्यात वाढत होत्या. (रु. ४,१८६ ते रु. ४,४००). या सप्ताहात त्या २.१ टक्क्यांनी घसरून रु. ४,४१९ वर आल्या आहेत स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,३१३ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (बिकानेर) किमतींपेक्षा जुलै २०१९ मधील फ्युचर्स किमती ५ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,५२९). मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शासनाने आता गेल्या हंगामातील खरेदी केलेली कडधान्ये बाजारात कमी किमतींत विक्री करण्याचा निर्णय केला आहे. त्याची अंमलबजावणी सरू झाली आहे. नवीन हमीभाव रु. ४,६२० आहे. (गेल्या वर्षी तो रु. ४,४०० होता). रब्बीची आवक सुरू झाल्यावर बाजारभाव हमीभावाच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. 

कापूस 
एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (मे २०१९) किमती मार्च महिन्यात वाढत होत्या. (रु. २१,२०० ते रु. २१,९६०). गेल्या सप्ताहात त्या २.२ टक्क्यांनी वाढून रु. २२,५२० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.८ टक्क्यांनी घसरून रु. २२,३३० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. २२,२५१ वर आल्या आहेत.  जुलै २०१९ च्या फ्युचर्स किमती रु. २२,८६० वर आल्या आहेत. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी कापसाचे उत्पादन कमी आहे. निर्यात मागणी अजून तरी वाढत आहे. आंतर-राष्ट्रीय किमतीसुद्धा वाढत आहेत. वाढीचा कल यापुढे टिकण्याचा संभव आहे. 

गहू  
गव्हाच्या (मे २०१९) किमती मार्च महिनाअखेर घसरल्या. (रु. १,८६२ ते रु. १,७९७). या सप्ताहात त्या रु. १,८७४ वर आल्या आहेत. स्पॉट (कोटा) किमती रु. १,९०३ वर  आल्या आहेत. जुलै २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ०.२ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. १,९०६). नवीन हमीभाव रु. १,८४० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,७३५ होता). एप्रिल-मे मध्ये बाजारभाव हमीभावाच्या जवळ असतील. 

(टीप - सर्व किमती प्रतिक्विंटल; कापसाची किंमत प्रति १७० किलोची गाठी).        

- arun.cqr@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com