माॅन्सून उद्या अंदमानात

monsoon
monsoon

पुणे - माॅन्सूनसाठी अंदमानाच्या दक्षिण भागात पोषक हवामान तयार झाले आहे. उद्या (शनिवार, ता. २६) अखेरच्या तासापर्यंत अंदमानात तो दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे.  साधारणपणे २० मेपर्यंत माॅन्सून अंदमानात दाखल होत असतो. यंदा पोषक हवामान तयार न झाल्याने हवामान विभागाने २३ मेपर्यंत माॅन्सून अंदमानात येण्याचा अंदाज वर्तविला होता. परंतु उशिराने पोषक हवामान तयार झाल्याने माॅन्सून येण्यास विलंब होत आहे. गुरुवारी हवामान विभागाने अंदमानाच्या दक्षिण भागात पोषक हवामान तयार झाल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे शनिवारपर्यंत माॅन्सून अंदमानात दाखल होणार आहे. 

केरळात साधारणपणे दरवर्षी एक जून रोजी माॅन्सून येतो. मात्र, हवामान विभागाने दोन ते तीन दिवस आधी म्हणजेच २९ मेपर्यंत माॅन्सून केरळमध्ये येण्याचे संकेत यापूर्वी दिले होते. परंतु, यंदा वेळेवर हवामान तयार न झाल्यामुळे तो वेळेवर येईल का याबाबत अद्याप स्पष्टता नाही. बंगालचा उपसागर व तमिळनाडूच्या परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून साधारपणे १.५ आणि ३.१ किलोमीटर उंचीवर आहे. मालदीव व कोमोरिन परिसरातही चक्राकार वाऱ्याची स्थिती असून ती समुद्रसपाटीपासून ५.८ आणि ७.६ किलोमीटर उंचीवर असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com