मराठवाडा, विदर्भात आज, उद्या पाऊस 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

पुणे : आज (ता.१२) विदर्भात बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उद्या (ता.१३) मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. उर्वरित भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. बुधवारपासून (ता.१४) गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुणे परिसरातही आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज आहे.  

गेल्या दोन दिवसापासून राज्यातील काही भागात ढगाळ हवामान होते. त्यामुळे मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली. कोकण, गोवा व विदर्भाच्या काही भागात तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय, मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. मध्य महाराष्ट्रातील निफाड येथे ११.० अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. 

रविवारी (ता.१२) सकाळी आठ वाजेपर्यतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस)  : मुंबई (सांताक्रुझ) १७.८, अलिबाग १८.६, रत्नागिरी १७.३, भिरा १६.०, डहाणू १७.६, पुणे १३.३, जळगाव १२.०, कोल्हापूर १८.१, महाबळेश्वर १५.७, मालेगाव १४.५ , नाशिक १२.३, निफाड ११.०, सांगली १६.१, सातारा १४.०, सोलापूर १८.२, औरंगाबाद १४.६, परभणी (कृषी विद्यापीठ परिसर) १२.५, परभणी शहर १३.९, उस्मानाबाद १३.६, अकोला १७.३, अमरावती १५.४, बुलढाणा १६.४, चंद्रपूर १८.४, गोंदिया १५.०, नागपूर १५.५, वर्धा १७.५, यवतमाळ १९.०

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news marathwada vidarbha rain