सोलर इन्व्हर्टरमुळे होते ऊर्जेची बचत

सोलर इन्व्हर्टरमुळे होते ऊर्जेची बचत

अलीकडे सोलर इन्व्हर्टरची गरज वाढलेली आहे. सोलर इन्व्हर्टर हे इतर इन्व्हर्टरसारखेच असून फक्त त्यात विद्युत ऊर्जेऐवजी सौरऊर्जेचा वापर होतो. हा इन्व्हर्टर डी.सी. ऊर्जेचे रूपांतरण ए.सी. ऊर्जेमध्ये करण्यासाठी सौरऊर्जेचा वापर करतो. सोलर इन्व्हर्टरमुळे डी.सी. ऊर्जेवर चालणारे संयंत्र ए.सी. ऊर्जेवरसुद्धा चालू शकते. यामध्ये सौरऊर्जेचा वापर होतो. आपल्याकडे सौरऊर्जा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. सौरऊर्जेमुळे प्रदूषण होत नाही. सौरऊर्जेवर चालणाऱ्या कोणत्याही उपकरणात सोलर इन्व्हर्टरचा वापर गरजेचा असतो. सोलर इन्व्हर्टरने रूपांतरण केलेली ए.सी. ऊर्जेचा वापर टी.व्ही., रेफ्रिजरेटर आणि इतर उपकरणे चालवण्यासाठी करता येतो.

सोलर इन्व्हर्टरचे कामकाज
सोलर इन्व्हर्टर हे सोलर पॅनलमधून निर्माण होणाऱ्या डी.सी. ऊर्जेचे रुपांतर ए.सी. ऊर्जेमध्ये करते. त्याचा वापर घरगुती विद्युतचलित उपकरणे चालवण्यासाठी केला जातो. 

सोलर इन्व्हर्टरमधील घटक ः १) ब्रिज ड्राइव्ह, २) ट्रान्स्फार्मर, ३) व्होल्टेज रेग्युलेटर, ४) ड्राइव्हर, ५) पी. डब्ल्यू.एम. इन्व्हर्टर, ६) सोलर पॅनल, ७) बॅटरी.

सोलर इन्व्हर्टरचा वापर करायचा असेल तर सुरवातीला अधिक गुंतवणूक करावी लागते. परिसरात सूर्यप्रकाश चांगल्या प्रकारे उपलब्ध असावा लागतो. जास्त जागा लागते. सूर्यप्रकाश नसताना वापरायचा असल्यास बॅटरी पूर्ण चार्ज असावी लागते.
 
सोलर इन्व्हर्टरचे फायदे
सौरऊर्जेमुळे जागतिक तापमान वाढ कमी करण्यास मदत. 
पैसा व उर्जेची बचत.
डी.सी. ऊर्जेचे रुपांतर ए.सी. ऊर्जेमध्ये.
कमी विजेचा वापर करणाऱ्यांसाठी उपयुक्त.
लहान घरासाठी व मोठ्या उर्जा निर्मिती करणाऱ्या कंपन्यामध्येही वापर.
आर्थिकदृष्ट्या परवडणारे, जनरेटरपेक्षा स्वस्त.

सोलर इन्व्हर्टरचे प्रकार
ऑफ ग्रीड इन्व्हर्टर - रिमोट सिस्टिममध्ये वापर
ग्रीड टाय इन्व्हर्टर - ग्रीडशी संबंधित असते. पुरवठा संपल्यास अापोआप बंद होते.
बॅटरी बॅकअप इन्व्हर्टर - बॅटरीमधील अतिरिक्त उर्जा वाचते, साठवण शक्य. गरजेनुसार वापर.
मायक्रो इन्व्हर्टर - हे सौर उद्योगातील प्रगत तंत्र आहे. हे यंत्र आकाराने लहान असून हाताळण्यास योग्य. यामध्ये इन्व्हर्टरचे सर्व गुणधर्म असतात.

डॉ. वैभवकुमार शिंदे, ९९६०९७५२७१ (कृषी अभियांत्रिकी विभाग, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, औरंगाबाद)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com