दोन आठवड्यांनंतर मॉन्सूनची प्रगती..

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

पुणे - नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) महाराष्ट्रात जवळपास दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर शनिवारी (ता. २३) पुढे चाल केली आहे. मॉन्सूनने संपूर्ण कोकण किनारपट्टी व्यापून गुजरातच्या वलसाड, मध्य महाराष्ट्रातील मालेगाव तर विदर्भातील अमरावतीपर्यंत मजल मारली आहे. मंगळवारपर्यंत (ता. १६) महाराष्ट्रासह देशातील आणखी काही भागात मॉन्सूनची वाटचाल शक्य असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. 

विषुववृत्ताकडून येणाऱ्या वाऱ्यांचा वेग कमी होणे, माॅन्सूनच्या वाटचालीसाठी आवश्‍यक ‘मेडिअन जुलिअन ऑस्सिलेशन’ची (एमजेओ) प्रतिकूल स्थिती, मध्य आणि पूर्व प्रशांत महासागर, पश्‍चिम गोलार्ध, आफ्रिकेलगत पूर्वेकडे जाणारे प्रवाह, वायव्य प्रशांत महासागरात हवेचे कमी झालेले दाब यामुळे मॉन्सूनवर परिणाम झाला. वाऱ्यांचे प्रवाह मंदावल्याने मॉन्सूनची महाराष्ट्रातील वाटचाल ११ जूनपासून झाली नव्हती. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ९ जूनपासून मॉन्सूनची स्थिती जैसे थे होती. मात्र ‘एमजेओची’ स्थिती पोषक झाल्यानंतर शनिवारी तब्बल १४ दिवसांनंतर या भागात मॉन्सूनेने दक्षिण गुजरातच्या वलसाड, मध्य महाराष्ट्रातील मालेगाव, विदर्भातील अमरावतीपर्यंत वाटचाल केल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.
 
मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक स्थिती निर्माण होत असून, मंगळवारपर्यंत (ता. २६) उत्तर अरबी समुद्र, उर्वरित महाराष्ट्र, आसाम, तसेच गुजरात, छत्तीसगड, ओडिशा, पश्‍चिम बंगाल, झारखंड, मध्य प्रदेशाच्या आणखी काही भागात माॅन्सूनची प्रगती होण्याची शक्यता आहे. तर वायव्य भारतातील राज्यांमध्ये बुधवारपासून विजांसह पूर्वमोसमी पावसाला सुरवात होईल, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: monsoon rain environment