शेवाळाची शेती हेच ठरेल भविष्य

सकाळ वृत्तसेवा
Monday, 23 April 2018

भविष्यामध्ये आहार, जैव इंधन, जागतिक पातळीवरील वाढत्या कर्बाची समस्या अशा अनेक घटकांवर शेवाळाची शेती महत्त्वाची ठरणार आहे. वाढत्या लोकसंख्येसाठी आवश्यक खाद्यान्नाची निर्मिती केवळ जमिनीवरील शेतीतून होऊ शकणार नाही, त्यासाठी पृथ्वीच्या दोन तृतीअंश असलेल्या पाण्याचाही वापर करावा लागणार आहे. अशा पाण्यामध्ये वाढणाऱ्या विविध शेवाळांवर जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात संशोधन होत आहे. कॉर्नेल विद्यापीठ, ड्युक विद्यापीठ आणि हिलो येथील हवाई विद्यापीठातील संशोधक एकत्रितरीत्या या विषयावर काम करत आहेत. त्यांच्या अभ्यासातील काही निष्कर्ष ‘अर्थस फ्युचर’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. 

कॉर्नेल विद्यापीठातील भू वातावरण शास्त्राचे प्रा. चार्ल्स ग्रीन म्हणाले की, जागतिक पातळीवर होत असलेल्या वातावणातील बदलांमध्ये कारणीभूत ठरणाऱ्या कार्बनडाय ऑक्साईडच्या समस्येवर मात करण्यासाठी शैवाल अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. चेस्टर (इंग्लंड) येथील सिंग्लास लि. कंपनीचे इयान आर्चिबाल्ड यांच्या संकल्पनेतून एकत्रित प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे. त्यात पहिल्यांदा संशोधकांनी जैव इंधन निर्मिती आणि कार्बनडाय ऑक्साईड ग्रहण करण्यासाठी शेवाळांवर लक्ष केंद्रित केले असले तरी त्यातील अनेक संभाव्य शक्यता आणि फायदे त्यांच्या लक्षात येत गेले. त्यातून अन्नाची निर्मिती शक्य आहे. उदा. ७००० एकरांवरील अशा प्रकल्पातून तेवढ्याच क्षेत्रातून सोयाबीन उत्पादनातून मिळणारी प्रथिने मिळतील. त्याच वेळी त्यातून १७ दशलक्ष किलोवॉट विद्युत ऊर्जा मिळेल. त्याचप्रमाणे ३० हजार टन कार्बन प्रति वर्ष वापरला जाईल. 

या प्रकल्पाचा आर्थिक फायदा ठरवताना त्यातून उपलब्ध होणारे पोषक पदार्थ आणि कार्बनची साठवणूक या दोन्ही मुद्द्यांचा विचार करावा लागेल. यातील कार्बन घटकाचा विचार न करताही सध्या मत्स्यशेतीमध्ये शेवाळ निर्मिती करून माशांची वाढ करणेही फायदेशीर ठरत असल्याचा दावा आहे. या माशांसाठी सध्या वापरले जाणारे खाद्य कमी करणे शक्य आहे. 

भविष्यामध्ये कार्बनची किंमत वाढत जाणार आहे. वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण कमी करण्यासाठी शाश्वत पर्याय शोधावा लागेल. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Moss farming