esakal | मुंबई : रेव्ह पार्टीशी संबंध नसल्यानेच त्यांना सोडले; ‘NCB’चा खुलासा | Nawab Malik
sakal

बोलून बातमी शोधा

Nawab Malik

मुंबई : रेव्ह पार्टीशी संबंध नसल्यानेच त्यांना सोडले; ‘NCB’चा खुलासा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab malik) यांनी आज केलेल्या आरोपानंतर (allegations) अमली पदार्थ नियंत्रक विभागाने (NCB) पत्रकार परिषद (press conference) घेऊन त्याचे खंडन केले. ‘एनसीबी’च्या म्हणण्यानुसार एकूण १४ व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले होते. त्यातील सहा जणांना सोडण्यात आले. त्यांचा रेव्ह पार्टीशी (rave party) काहीच संबंध नव्हता म्हणून त्यांना सोडल्याचा खुलासा (explanation) तपास संस्थेकडून करण्यात आला. ‘एनसीबी’वर होणारे आरोप बिनबुडाचे असून प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: Mumbai : ‘एनसीबी’ने त्या तिघांना का सोडले?

दरम्यान, ‘एनसीबी’चे पथक आता शाहरूख खान याच्या वाहनचालकाची चौकशी करणार असल्याचेही समजते. नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपानंतर ‘एनसीबी’चे उपसंचालक ज्ञानेश्वर सिंग यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, ताब्यात घेण्यात आलेल्या १४ जणांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. आर्यन खानसह आठ जणांना अटक करण्यात आली. इतर सहा जणांना सोडण्यात आले. पुढे चौकशीसाठी आवश्यक वाटल्यास कायद्यानुसार त्यांना बोलावण्यात येईल, असेही ते म्हणाले.

पार्टीतील ऑपरेशनमध्ये तब्बल नऊ साक्षीदारांना सहभागी करण्यात आले होते. त्यात मनीष भानुशाली आणि किरण गोसावी यांचा समावेश होता. नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांनुसार तीन जणांना २ आॅक्टोबर रोजी रात्री उशिरा सोडण्यात आले. त्याबाबत सिंग म्हणाले, की रेव्ह पार्टीत उच्चभू व्यक्तींचा समावेश होता. त्यांच्या आणि एनसीबीच्या सुरक्षेच्या दृष्टीने नियंत्रण ठेवण्यात आले होते. पंचनामा घटनास्थळावर केला आहे. त्यावर तारीख आणि वेळेचा उल्लेख आहे. पंचनाम्याचा समावेश आरोपपत्रात करण्यात येणार आहे, असेही सिंग म्हणाले. केवळ मुंद्रा पोर्टवरील ड्रग्ज साठ्याच्या प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी खटाटोप करण्यात आल्याचा आरोपही मलिक यांनी केला आहे.

प्रवीण दरेकर यांनी आरोप फेटाळले

विधानसभेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नवाब मलिक यांचे आरोप फेटाळून लावले. केवळ प्रसिद्धीसाठी स्टंट सुरू असून एनसीबीने त्यांच्या जावयाला अटक केल्याने नैराश्येतून ते असे आरोप करीत आहेत, असेही ते म्हणाले.

loading image
go to top