बारमाही भाजीपाला अन् कुटुंबाची एकी

माणिक रासवे
Friday, 23 November 2018

परभणी शहरापासून सुमारे दहा किलोमीटरवरील इटलापूर येथील दत्तात्रय व बाळासाहेब या पुंड बंधूंचे संयुक्त कुटुंब दहा एकर शेती कसते. सुमारे एक एकरात वर्षभर थोड्या थोड्या गुंठ्यात १२ ते १३ प्रकारचा भाजीपाला पिकवला जातो. एकत्रित शेती, थेट विक्री या बाबींसमवेत हंगामनिहाय पिके व जनावरे संगोपनाची जोड यातून आपल्या शेतीचा आर्थिक डोलारा आजच्या प्रतिकूल स्थितीतही त्यांनी यशस्वी पेलला आहे.

परभणी शहरापासून सुमारे दहा किलोमीटरवरील इटलापूर येथील दत्तात्रय व बाळासाहेब या पुंड बंधूंचे संयुक्त कुटुंब दहा एकर शेती कसते. सुमारे एक एकरात वर्षभर थोड्या थोड्या गुंठ्यात १२ ते १३ प्रकारचा भाजीपाला पिकवला जातो. एकत्रित शेती, थेट विक्री या बाबींसमवेत हंगामनिहाय पिके व जनावरे संगोपनाची जोड यातून आपल्या शेतीचा आर्थिक डोलारा आजच्या प्रतिकूल स्थितीतही त्यांनी यशस्वी पेलला आहे.

परभणी शहरापासून सुमारे दहा किलोमीटरवर इटलापूर (ता. परभणी) हे गाव आहे. येथील पुंड कुटुंब भाजीपाला शेतीसाठी प्रसिद्ध आहे. त्यांची एकूण दहा एकर शेती आहे. आजची शेती विविध संकटांमध्ये सापडली असताना शेतीचा व कुटुंबाचा आर्थिक गाडा सुरळीत चालावा यासाठी या कुटुंबाने केलेले प्रयत्न निश्‍चित कौतुकास्पद आहेत. 
पुंड यांची बलस्थाने कोणती? 
१) कुटुंबाची एकी

    दोघे भाऊ व त्यांच्या पत्नी असे चारही जण लागवडीपासून ते काढणी, प्रतवारीपर्यंत एकत्र राबतात. त्यामुळे कष्टाचा भार हलका होतो. मजुरांवरील अवलंबित्व व त्यावरील खर्चही कमी होतो.
    नऊ जणांचे कुटुंब आहे. आई सुमन या घरची जबाबदारी सांभाळतात. जबाबदाऱ्या विभागल्याने कामांचे नियोजन सुकर होते. 
    कापूस वेचणी, ज्वारी, गव्हाच्या सुगीसाठी गरज पडल्यास मजुरांची मदत घेतली जाते. 

अन्य पिकांचा आधार 
भाजीपाला विक्रीतून दररोजचा घरखर्च तसेच शेतीकामाच्या खर्चासाठी हाती पैसा येतो. त्यामुळे  सोयाबीन, तूर, कापूस आदी माल तातडीने विकायची गरज पडत नाही. दरात तेजी येईपर्यंत तो साठवून ठेवण्यावर भर असतो. दर वाढल्यानंतर विक्री केली जाते. उत्पन्नातून केलेल्या बचतीमधून पुंड कुटुंबीयांनी शेतात सिमेंट विटांच्या पक्क्या घराचे बांधकाम केले. दोन बहिणींची लग्ने केली आहेत. मुले चांगल्या शाळेत शिक्षण घेत आहेत. एकत्रित कुटुंबाच्या कष्टामुळे हे सारे शक्य झाल्याचे बाळासाहेब सांगतात. 

ठळक बाबी
अनुभवातून दर्जेदार वाणांचे बियाणे बाजारातून खरेदी केले जाते. त्यापासून शेतातच रोपनिर्मिती. रोपांची उगवण व्यवस्थित होण्यासाठी काळजी

यंदाच्या वर्षी दुष्काळाची स्थिती गंभीर. विहिरीवरची मोटर दररोज तीन तास चालते. हे पाणी चुलत्यांनादेखील द्यावे लागते. सध्या पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. पाण्याची उपलब्धता पाहून भाजीपाला क्षेत्र कमी करावे लागण्याची स्थिती 

टप्प्याटप्प्याने भाजीपाला लागवड होत असल्याने वर्षभर भाजीपाला व पर्यायाने उत्पन्न सुरू राहते. 

पीक विविधता ठेवल्याने दरांबाबतची जोखीम कमी होऊन जाते.  

चार गुंठे क्षेत्रावर अॅस्टर फुलाचाही लागवड केली आहे. त्यापासूनही अतिरिक्त उत्पन्न मिळते. 

दत्तात्रय यांच्यावर शेतातील कामे तसेच बैलजोडी, गायी, म्हशींचा सांभाळ यांचीही जबाबदारी आहे. ही कामे करुन ते भाजीपाला काढणीही करतात. घरातील महिला सदस्यांची त्यांना मोठी मदत मिळते. 

भाजीपाला काढणी झाल्यानंतर पाण्याने धुवून स्वच्छ करण्यात येतो. मोटारसायकलवरून क्रेट वाहून नेण्यासाठी लोखंडी स्टॅन्ड तयार करून घेतले आहे. 

यंदा दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे घरी खाण्यापुरता म्हणून पाच गुंठे क्षेत्रावर ठिबक सिंचन पद्धतीने गहू घेतला आहे. ज्वारीदेखील घरच्यापुरती घेण्यावर भर. सुमारे १० ते १२ क्विंटल प्रमाणात होते. 

बाळासाहेब पुंड - ८९७५२८०१९५


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Family Vegetable Agriculture