गुरुवारपर्यंत पावसाची उघडीप

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 सप्टेंबर 2018

पुणे - मॉन्सूनचे प्रवाह मंदावल्याने राज्यात पावसाने दडी मारली आहे. कोकणात काही ठिकाणी पावसाचा अंदाज असून, उर्वरित महाराष्ट्रात गुरुवारपर्यंत (ता.७) पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. राज्यात अंशत: ढगाळ हवामानासह ऊन-सावल्यांचा खेळ सुरू असून, अधून-मधून एखाददुसरी जोरदार सर शिडकावा करीत आहे. उन्हाचा चटका  वाढल्याने दिवस-रात्रीच्या तापमानातही वाढ झाली आहे. 

पुणे - मॉन्सूनचे प्रवाह मंदावल्याने राज्यात पावसाने दडी मारली आहे. कोकणात काही ठिकाणी पावसाचा अंदाज असून, उर्वरित महाराष्ट्रात गुरुवारपर्यंत (ता.७) पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. राज्यात अंशत: ढगाळ हवामानासह ऊन-सावल्यांचा खेळ सुरू असून, अधून-मधून एखाददुसरी जोरदार सर शिडकावा करीत आहे. उन्हाचा चटका  वाढल्याने दिवस-रात्रीच्या तापमानातही वाढ झाली आहे. 

राज्यात पाऊस थांबल्यानंतर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात दिवसाचे तापमान सरासरीच्या वर गेले आहे. अनेक ठिकाणी पारा ३० अंशांच्या वर गेला आहे. ढगाळ हवामानामुळे विदर्भात पारा सरासरीच्या खाली असला, तरी त्यात हळूहळू वाढ होत आहे. उन्हाच्या चटक्याबरोबर राज्यात उकाडाही वाढला आहे. मराठवाडा वगळता राज्यात रात्रीचे तापमान सरासरीच्या जवळपास अाहे.    

माॅन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा फिरोजपूरपासून उत्तर अंदमान समुद्रापर्यंत स.िक्रय आहे. उत्तरेकडे सरकलेला मॉन्सूनचा आस, विषवृत्ताच्या दक्षिणेकडून येणाऱ्या मॉन्सून प्रवाहाचा मंदावलेला वेग यामुळे महाराष्ट्रासह दक्षिण भारतात पाऊस आेसरला आहे. गुरुवारपर्यंत (ता. ६) कोकणात काही ठिकाणी, तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज अाहे.  

रविवारी (ता.२) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे २८.१, जळगाव ३१.७, कोल्हापूर २८.०, महाबळेश्वर १८.८, मालेगाव ३१.०, नाशिक २८.२, सांगली २८.६, सातारा २६.५, सोलापूर २९.७, सांताक्रुझ ३१.०, अलिबाग ३१.३, रत्नागिरी २९.३, डहाणू ३०.४, आैरंगाबाद ३०.६, परभणी ३१.४, नांदेड ३१.५, बीड ३२.४, अकोला ३१.५, अमरावती २८.४, बुलडाणा २९.२, चंद्रपूर ३१.०, गोंदिया २८.५, नागपूर २८.३, वर्धा २९.०, यवतमाळ २७.५. 

 

रविवारी (ता.२) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये, स्त्रोत - कृषी विभाग) :

कोकण : रामरज २८, पायंजे २०, वशी २९, मानगाव २२, पोलादपूर २५, खामगाव २२, मार्गताम्हणे २५, रामपूर ३०, शिरगाव ३२, अंजर्ला २०, भरणे २१, दाभील २०, धामनंद ३७, देव्हारे २१, अांगवली २०, माणगाव २३, भेडशी २२, कडूस २१, तळवडा २१.

मध्य महाराष्ट्र : नाणशी २४, इगतपुरी २७, त्र्यंबकेश्‍वर २१, शेंडी २५, बामणोली ४३, महाबळेश्‍वर ५४, अांबा २४, मराठवाडा : मातोळा २७, बोधडी २४, जलधारा २१.

विदर्भ : कान्हाळगाव ६३, काट्टीपूर ३६, ठाणा ३७, आमगाव ३४, कवरबांध ३४, सालकेसा ३६, जिमलगट्टा ११०, पेरामल्ली ३२. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rain until Thursday