कोकण, मध्य महाराष्ट्रात जोर वाढणार

कोकण, मध्य महाराष्ट्रात जोर वाढणार

पुणे  : उत्तर महाराष्ट्र ते कर्नाटक दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र आहे. अरबी समुद्र, उत्तर कोकण व दक्षिण गुजरात या परिसरात चक्रावाताची स्थिती आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत असून, पावसाचा जोर वाढणार आहे.

दरम्यान, बुधवारी (ता. २४) कोकणात धारावी, कोयना, डुंगरवाडी या घाटमाथ्यावर; तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्या. यामुळे खरीप हंगामातील पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

आंध्र प्रदेश, दक्षिण मध्य महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, तेलंगाण आणि रायलसीमा परिसरात कमी दाबाचे क्षेत्र आहे. या क्षेत्राचे चक्राकार वाऱ्यांमध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे. यामुळे आज (गुरुवारी) कोकण व मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर ,मराठवाडा व विदर्भात हवामान अंशत- ढगाळ राहणार असून, तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडतील. अरबी समुद्रात असलेल्या चक्रावातामुळे वारे ताशी ४० ते ५० वेगाने वाहतील. त्यामुळे कोकण परिसरातील मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान विभागाच्या सूत्रांनी दिला आहे.   उत्तर भारतातही बिकानेर, अलवार, ग्वालियर, हमीरपूर, वाराणसी, बुर्दवान, हल्दिया ते बंगालचा उपसागर या भागांत कमी दाबाचे क्षेत्र आहे. यामुळे भरोबीशा येथे सर्वाधिक ४०० मिलिमीटर पाऊस पडला आहे. चेरापुंजी, बहरीच, सिलचर, विजयवाडा, मंगलोर येथे जोरदार पाऊस पडला. कोकणातील गुहागर, कुलाबा, चिपळून, राजापूर येथेही जोरदार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील गगनबावडा, महाबळेश्वर, हातकणंगले, शाहूवाडी येथे मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या. तसेच धारावी, कोयना, डुंगरवाडी या घाटामाथ्यावरही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. मराठवाडा व विदर्भात हवामान ढगाळ असून, अधूनमधून ऊन-सावल्याचा खेळ सुरू होता.

बुधवारी (ता. १९) सकाळी साडेआठपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणी पडलेला पाऊस मिलिमीटरमध्ये - (स्रोत - हवामान विभाग) 

कोकण - गुहागर २५०, कुलाबा १७०, चिपळून १५०, राजापूर १३०, मुलदे १२०, खेड, सावंतवाडी ११०, वसई, देवगड, कुडाळ, दोडामार्ग १००, मालवण, रामेश्वर ९०, सांताक्रुझ, पालघर, मंडणगड, अलिबाग ८०, भिरा ७०, कनकवली ६०, हर्णे, रत्नागिरी, लांजा, वैभववाडी, ठाणे ५०, संगमेश्वर देवरूख, भिवंडी ४०, माथेरान ३०, डहाणू, म्हसळा २०, सुधागड पाली, उल्हासनगर, वेंगुर्ला, रोहा, महाड, माणगाव १०.

मध्य महाराष्ट्र - गगनबावडा ७०, महाबळेश्वर ३०, हातकणंगले, शाहूवाडी ३०, विटा, राधानगरी, आजरा २०, चंदगड, जावळी, सुरगाणा, लोणावळा, गारगोटी, वेल्हे, पन्हाळा १०.

घाटमाथा - धारावी १५०, कोयना ८०, डुंगरवाडी ७०, शिरगाव, अंबोणे, दावडी ३०, वळवण, कोयना (नवजा), ताम्हिणी २०, लोणावळा, खोपोली १०.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com