esakal | शेतकऱ्याची कमाल! लाल भेंडी पिकवत मिळवला मोठा नफा
sakal

बोलून बातमी शोधा

Red Ladies finger/Okra

शेतकऱ्याची कमाल! लाल भेंडी पिकवत मिळवला मोठा नफा

sakal_logo
By
सुधीर काकडे

एकीकडे आस्मानी आणि सुल्तानी संकटांनी शेतकरी त्रस्त असताना दुसरीकडे शेतीमध्ये होणारे नवनवीण प्रयोग शेतकऱ्यांसाठी तारक ठरता आहेत. शेतीला कष्टासोबत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत दगडालाही घाम फोडणाऱ्या शेतकऱ्यांच्या कहाण्या आपल्याला ऐकायला मिळतात. मध्यप्रदेशमधील एका शेतकऱ्याने अशीच किमया करुन दाखवली आहे. आतापर्यंत आपण हिरवी भेंडी पाहिली असेल, मात्र भोपाळच्या या शेतकऱ्याने लाल भेंडी (Red Ladies finger) पिकवली आहे.

Red Ladies finger/Okra

Red Ladies finger/Okra

भेंडी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर तजेलदार हिरवी भेंडी येते. मात्र मध्यप्रदेशच्या भोपाळमधील शेतकऱ्याने आपल्या शेतात थेट लाल रंगाची भेंडी पिकवत सर्वांनाच आवाक केलं. खजूरी कला गावात राहणाऱ्या मिश्रीलाल राजपूत या शेतकऱ्याने जुलै महिन्यात या पिकाची लागवड केली होती. भेंडीच्या वैशिष्ट्याबद्दल सांगताना मिश्रीलाल राजपूत यांनी ही भेंडी हिरव्या भेंडीपेक्षा जास्त पौष्टिक असल्याचं सांगितलं. आहारात या भेंडींचा समावेश केल्याने रक्तदाब, मधुमेह आणि कोलेस्ट्रॉलशी संबंधीत अनेक आजारांवर ही भेंडी उपयुक्त ठरते. विशेष म्हणजे बाजारात या भेंडीला हिरव्या भेंडीपेक्षा जास्त भाव मिळतोय.

हेही वाचा: हरभरा-राजमा पिकाची शेती आता खरिपातही

लाल रंगाची ही भेंडी पिकवण्यासाठी शेतकऱ्याने बनारसवरुन या भेंडीच बीयाणं आणलं होतं. एक एकर क्षेत्रात सरासरी ४०-५० क्विंटल भेंडी आली असून जास्तीत जास्त ७० क्विंटल पर्यंत भेंडी पिकवली जाऊ शकते अशी माहिती या शेतकऱ्याने एएनआयला दिली आहे. काही मॉलमध्ये या भेंडीचे २५० ते ५०० किमीचे पॉकेट ८० रुपये ते ४०० रुपयांनी विकले जात असल्याचे या शेतकऱ्याने सांगितले आहे. इंडियन काउन्सिल ऑफ अॅग्रीकल्चरल रिसर्च सेंटरमध्ये या लाल भेंडीचा शोध लागला होता. २३ वर्षांच्या संशोधनानंतर भेंडींचं हे वाण सापडलं असून काशि लालिमा असं या भेंडीचं नाव आहे.

loading image
go to top