
...म्हणून राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारणार नाही! - राजेंद्र पवार
कृषी उद्योजक तसंच शरद पवारांचे पुतणे राजेंद्र पवार यांनी राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार राजेंद्र पवार यांना जाहीर झाला आहे. त्याचा वितरण सोहळा आज पार पडत आहे. पण राजेंद्र पवार यांनी आपण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारणार नाही, अशी भूमिका मांडली आहे.
राज्यपालांमुळे राज्यातली शांतता धोक्यात आली असून त्यांनी फुले दाम्पत्याबद्दल वादग्रस्त विधानं केली होती. त्यांच्याकडून पुरस्कार स्वीकारण्यापेक्षा मी कृषी खात्याच्या कर्मचाऱ्यांकडून पुरस्कार स्वीकारेन, अशी भूमिका पवार यांनी घेतली आहे. राजेंद्र पवार म्हणाले, "महाराष्ट्राच्या इतिहासावर कारण नसताना वादग्रस्त विधान करणारे आणि आपल्या अस्तित्वांवर जे घाला घालतात, अशा व्यक्तीच्या हस्ते हा पुरस्कार घेण्यापेक्षा हा पुरस्कार महाराष्ट्रात ज्यांनी दिलाय कृषी विभागाने. त्यांच्या कार्यालयात जाऊन कर्मचाऱ्यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारणं मला जास्त अभिमानास्पद वाटेल."
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले या दाम्पत्याबद्दल वादग्रस्त विधाने केली होती. या विधानांमुळे मोठा गहजब माजला होता. राज्यभरातून त्यांच्या या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला जात होता.
Web Title: Rohit Pawar Father Rejected Award By Governor Bhagatsingh Koshyari
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..