सांगलीत बटाट्यास १५०० ते २२०० रुपये 

प्रतिनिधी
गुरुवार, 9 जानेवारी 2020

विष्णूअण्णा पाटील दुय्यम बाजार आवारात बुधवारी (ता. ८) बटाट्याची ७७० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १५०० ते २२०० रुपये असा दर होता, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

सांगली  - विष्णूअण्णा पाटील दुय्यम बाजार आवारात बुधवारी (ता. ८) बटाट्याची ७७० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १५०० ते २२०० रुपये असा दर होता, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

बाजार समितीत हळद, मिरची, हरभरा, बेदाण्याची आवक कमी अधिक आहे. धान्यांची आवक कमी झाली आहे. तांदळाची ३० क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रतिक्विंटल २४०० ते ६५०० तर सरासरी ४४५० रुपये असा दर मिळाला. ज्वारीची २० क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रतिक्विंटल २००० ते २५००, तर सरासरी २२५० रुपये असा दर मिळाला. गव्हाची २५ क्विंटल आवक झाली. गव्हास प्रतिक्विंटल २५०० ते ३२००, तर सरासरी २८५० रुपये असा दर मिळाला. बाजरीची ४० क्विंटल आवक झाली. त्यास प्रति क्विंटल २००० ते २५०, तर सरासरी २२५० रुपये असा दर होता.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

डाळिंबांची २९१ क्विंटल आवक झाली असून, त्यांना प्रतिक्विंटल १००० ते ६००० असा दर होता. सफरचंदाची ८५ क्विंटल आवक झाली होती. त्यांना प्रतिक्विंटल ४००० ते ९००० रुपये असा दर मिळाला. संत्र्यांची ९४ क्विंटल आवक झाली होती. त्यांना प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये असा दर होता. पपईची १४ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल १००० ते ५००० रुपये असा दर मिळाला. बोरांची ११७ क्विंटल आवक झाली. बोरांना प्रतिक्विंटल ५०० ते २००० रुपये असा दर होता. चिकूची ६४ क्विंटल आवक झाली होती. चिकूस प्रतिक्विंटल १५०० ते ५००० रुपये असा दर मिळाला. आल्याची ७ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल ७००० ते १०००० रुपये असा दर होता. 

हेही वाचा : चार एकर शेततळ्यात आधुनिक पद्धतीने मत्स्यपालन

शिवाजी मंडईत भाजीपाला आवक वाढली
शिवाजी मंडईत भाजीपाल्यांची आवक वाढली आहे. मेथीची ३ हजार पेंढ्यांची आवक झाली. त्यांना प्रतिशेकड्यास ३०० ते ४०० रुपये असा दर होता. शेपूची ३ हजार पेंढ्याची आवक झाली. शेपूस प्रतिशेकडा ३०० ते ४०० रुपये असा दर मिळाला. कोथिंबिरीची ८ हजार पेंढ्याची आवक झाली. त्यास प्रतिशेकड्यास ४०० ते ५०० रुपये असा दर मिळाला. कांदा पातीची १ हजार पेंढ्यांची आवक झाली. त्यास प्रतिशेकड्यास १००० ते १२०० रुपये असा दर मिळाला. पालकाची २ हजार पेंढ्यांची आवक झाली. त्यास प्रतिशेकडा २०० ते ३०० रुपये असा दर होता.

अॅग्रोवन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli potato to Rs 1500 to 2200

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: