esakal | शेतकऱ्यांनो! थांबा, 80-100 मिलिमीटर पाऊस झाल्यावरच पेरणी करा
sakal

बोलून बातमी शोधा

sowing

शेतकऱ्यांनो! थांबा, 80-100 मिलिमीटर पाऊस झाल्यावरच पेरणी करा

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील (maharashtra) काही भागांत अवकाळी पाऊस (rain) हाेत आहे. यामुळे शेतीच्या (farm) मशागतीच्या कामावर परिणाम हाेत आहे. सातारा (satara) जिल्ह्यातील क-हाड (karad) , सातारा या तालुक्यातही गेली तीन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. या दाेन दिवसांत क-हाड, मलकापूर येथे जाेरदार पाऊस झाला. याबराेबरच उंडाऴेसह सातारा तालुक्यातील गावांमध्ये पाऊस झाल्याने शेतीचे कामे खाेळंबली हाेती. दरम्यान पुढील काही दिवस पावासाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी किमान 80 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी (sowing) करु नये असे आवाहन राज्याच्या कृषी विभागाने केले आहे. (satara-agro-news-agriculture-department-appeals-farmers-about-sowing)

आजपासून (ता. 2) शुक्रवारपर्यंत (ता. 4) या कालावधीमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र ,मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शनिवारी (ता. 5) विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खाते , कृषी हवामान शास्त्र विभाग ,पुणे यांनी वर्तवली आहे. यामुळे शेतक-यांनी सोयाबीन, बाजरी, भुईमूग व मका या पिकांच्या नियोजना करता पेरणीची पूर्वतयारीची कामे करावीत.

हेही वाचा: Heavy Rain : कऱ्हाड-मलकापुरात मुसळधार; रस्ते झाले 'जलमय'

भात पिकासाठी रोपवाटिकाची पूर्वतयारी चालू ठेवावी. खरीप हंगामातील सोयाबीन या पिकांसाठी जमिनीच्या प्रकारानुसार जमिनीची निवड पूर्व मशागतीची कामे करावीत. सोयाबीन, बाजरी, उडीद , मूग , मका या खरीप पीक पेरणीसाठी शेतजमीन नांगरणी व वाखराच्या पाळ्या देऊन तयार करावी असे कृषी विभागाने कळविले आहे.

जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी किमान 80 ते 100 मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्या नंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते.

80-100 मिलिमीटर पाऊस झाल्यास पुरेशा खोलीवर ओलावा जातो व खंड पडल्यास पीक तग धरू शकते. त्यामुळे शेतकर्यांनी पेरणीची घाई करू नये असे आवाहन राज्याच्या कृषी विभागाने केले आहे.

हेही वाचा: पठाण कुटुंबीयांनी 300 रुपयात खोदली विहीर; 18 फुटांवर लागलं पाणी

ब्लाॅग वाचा