Monsoon Update : पेरणीसाठी घाई करू नका, दमदार पावसाची वाट पाहा; कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला

Maharashtra Rain News : पेरणी केल्यास बियाणे उगवण क्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Sow Seeds
Sow Seedsesakal
Summary

कृषी विभागाला आणि बियाण्याला दोष देण्यापेक्षा पेरणीसाठी पुरेशी ओल निर्माण होऊ द्या.

विंग : दमदार पाऊस (Rain) व जमिनीत पुरेसा ओलावा झाल्यानंतरच पेरणी करा. त्यासाठी घाई करू नका, असा सल्ला उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयातील तंत्र अधिकारी रियाज मुल्ला यांनी विंगसह परिसरातील शेतकऱ्यांना दिला.

खरीप हंगामाच्या (Kharif Season) पार्श्वभूमीवर उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयातील तंत्र अधिकारी श्री. मुल्ला व सहकाऱ्यांनी विंग व कोळे विभागात भेट दिली. शेतीची पाहणी केली.

Sow Seeds
Laxman Mane : 'RSS कडून फोडाफोडीचं राजकारण, त्या 9 आमदारांनी शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला'

दरम्यान, जमिनीत खड्डा काढून ओलाव्याचा स्तर तपासला. पुरेशी ओल नसल्याचे निदर्शनास येताच अशा घातीवर पेरणी केल्यास बियाणे उगवण क्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ते म्हणाले, कृषी विभागाला आणि बियाण्याला दोष देण्यापेक्षा पेरणीसाठी पुरेशी ओल निर्माण होऊ द्या. त्यासाठी दमदार व पुरेशा पावसाची वाट बघा.

Sow Seeds
Karnataka : तीन महिन्यात कर्नाटकातील काँग्रेस सरकार कोसळणार; माजी मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्याने खळबळ

किमान सात ते दहा इंच ओल जाणे अपेक्षित आहे. मगच पेरणीची कामे हाती घ्या. जानेवारी फेब्रुवारी दरम्यान, विंग परिसरात वळीव झालेले नाहीत. त्यातच जून कोरडा गेला आहे. अधूनमधून रिपरिप असली तरी पेरणीस योग्य वाफसा तयार झालेला नाही. त्यासाठी घाई करू नका, ढेबेवाडी मंडलकृषी अधिकारी चंद्रकांत कोळी, कोळे कृषी सहायक संतोष काळे, कृषी सहायक आर. एस. भांदिर्गे यासह शेतकरी यावेळी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com