राज्याचा अर्थसंकल्पही शेतकरी केंद्रित असेल - मुनगंटीवार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 फेब्रुवारी 2019

अकोला - राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क हा शेतकऱ्यांचा आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्यसुद्धा भविष्यात मागे राहणार नाही, यंदा राज्याचा अर्थसंकल्प शेतकरी केंद्रित असेल, असे संकेत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे दिले.

अकोला येथील कृषी विद्यापीठाच्या समारंभासाठी मंगळवारी (ता. ५) ते येथे आले होते. या वेळी कृषिमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना मंत्री मुनगंटीवार माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘‘केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी नेहमी खंबीरपणे उभे राहिले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत या देशामध्ये सर्वांत जास्त निधी उपलब्ध करणारे हे राज्य आहे. या राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क हा शेतकऱ्यांचा आहे. हे रयतेचे राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार घेऊन हे सरकार चालते आहे आणि म्हणून केंद्राने सहा हजार रुपयांची वार्षिक मदत घोषित केली आहे. राज्य सुद्धा भविष्यात मागे राहणार नाही. जय किसान म्हणत शेतकऱ्यांचा सन्मान वाढवत या राज्यातील शेतकरी, अन्नदाता सुखी भव या भावनेने पुढच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी हा केंद्रबिंदू राहील हा विश्‍वास मी शेतकऱ्यांना देतो.’

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State Budget Farmer Sudhir Mungantiwar