महिला शेतकऱ्यांनी सांगितल्या स्मार्ट शेतीच्या यशकथा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 2 October 2018

राज्यातील महिला शेतकरीदेखील स्मार्ट शेतीतून जीवनात बदल घडवून   आणण्यात कुठेही मागे राहिलेल्या नाहीत. कृषिकल्चरमध्ये याच महिलांनी शेतीमधील प्रयोग करताना स्मार्ट व्हिलेजच्या आम्ही स्मार्ट शेतकरी होणार असा संकल्प व्यक्त केला. 

शेतकरी असलेल्या विमल आचारी, अंजली वामन आणि अनिता म्हालगे यांनी यशस्वी शेतकरी म्हणून कशा पद्धतीने वाटचाल केली याची माहिती कृषिकल्चरमध्ये सांगितली. तनिष्काच्या सहयोगी संपादक वर्षा कुलकर्णी यांनी या मुलाखतीत रंग भरला. 

विमल आचारी म्हणाल्या की, गावातील वीस महिलांनी शेती सांभाळून गावाच्या सामाजिक उपक्रमात देखील भाग घेतला. कुऱ्हाडबंदी आणि वनांचे रक्षण करण्यात आम्ही पुढाकार घेतल्यामुळे आम्हाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. कुऱ्हाडबंदीमुळे मिळालेल्या दोन लाखांच्या बक्षिसातून ग्रामपंचायतीचे कर्ज चुकते करण्यासाठी मदत झाली. शेतमालावर प्रक्रिया करून विक्री होत असल्यामुळे जादा पैसा मिळू लागला आहे.

सकाळ आणि अॅग्रोवनच्या पाठपुराव्यातून साकार होत असलेल्या स्मार्टव्हिलेज संकल्पनेमुळे आमच्यासारख्या महिलांना व्यासपीठ मिळाले, असे अंजली वामन यांनी स्पष्ट केले. त्या म्हणाल्या की, शेती परवडते, तुम्हाला फक्त त्यात कौशल्यपूर्वक श्रम करावे लागतात. स्मार्ट व्हिलेजचे आम्ही स्मार्ट शेतकरी असण्याचा आम्हाला अभिमान आहे. शेतीमधील मूल्यवर्धन, मल्चिंग, सूक्ष्म सिंचनाचा वापर यामुळे आमची शेती कधीही तोट्यात गेली नाही. सकाळच्या स्मार्टव्हिलेज उपक्रमात निवड झाल्याने एक नवी दिशाला गावाला मिळाली आहे.

सोलापूरच्या अनिता म्हालगे म्हणाल्या, महिला शेतकऱ्यांनी पुढाकार घेत पहिली महिला शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली. आठवडे बाजार, मॉलमध्ये डाळीची विक्री केली. वेफर्स मशीन, मिरची कांडप मशीन अनुदानातून मिळाले. आम्ही जॉइंट लायबिलीटी ग्रुपची स्थापना करून यशस्विनी अॅग्रो प्रोसेसिंग कंपनीच्या माध्यमातून दोन कोटींचे कर्जवाटप करत आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Success stories of smart farming by women farmers