Goat Farming मधून महिन्याला १ लाखांचं उत्पन्न, कोकणातील तरुणाने नोकरी ऐवजी निवडलं शेळीपालनाचं करिअर

भारतात आणि महाराष्ट्रात शेळी पालन व्यवसायातून Goat Farming चांगला नफा मिळवणं शक्य आहे. अगदी कमी जागेत आणि कमी गुंतवणूकीतही Investment शेळीपालन व्यवसाय सुरु करणं सहज शक्य आहे
शेळीपालक अमोल शिरकर
शेळीपालक अमोल शिरकरEsakal

भारतामध्ये असे अनेक शेतीपूरक व्यवसाय आहेत. ज्या मधून मोठा नफा Profit कमावणं शक्य आहे. यातील अनेकांनी असा व्यवसाय हा मुख्य व्यवसाय म्हणून करून लाखोच्या घरात कमाई करण्यास सुरुवात केली आहे. यापैकीच एक म्हणजे शेळी पालनाचा व्यवसाय. Success Story of Amol Shirkar Agri Business Goat Farmer from Ratnagiri

भारतात आणि महाराष्ट्रात शेळी पालन व्यवसायातून Goat Farming चांगला नफा मिळवणं शक्य आहे. अगदी कमी जागेत आणि कमी गुंतवणूकीतही Investment शेळीपालन व्यवसाय सुरु करणं सहज शक्य आहे. योग्य व्यवस्थापन केल्यास शेळीपालनातून चांगलं उत्पन्न मिळवता येऊ शकतं. सध्या अनेक तरुण या व्यवसायाकडे वळत आहेत. यापैकीच एक म्हणजे रत्नागिरीमधील अमोल शिरकर.

शेळीपालन व्यवसायातून अमोल शिरकर १ लाखांहून जास्त उत्पन्न मिळवत आहेत. अमोल यांच्या म्हणण्यानुसार भारतामध्ये शेळीपालन व्यवसाय आता हळूहळू वाढत असून त्याला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. म्हणूनच शिरकर अॅग्रो टेक इंडस्ट्रीज शेळीपालन आणि सर्व प्रकारच्या शेळ्यांच्या जातींचा व्यापार करण्यावर भर देत आहे.

योग्य मार्गदर्शन घेऊन सुरु केला व्यवसाय

अमोल शिरकर यांनी शेळीपालन व्यवसाय सुरु करण्यापूर्वी सरकारी संस्थेमधून २ महिन्याचं प्रशिक्षण घेतलं. उस्मानाबाद येथे आयोजित अॅग्री-क्लिनिक अँड अॅग्री-बिझनेस सेंटर (AC&ABC) योजनेंतर्गत उद्योजकीय कौशल्यांसाठी प्रशिक्षणात सहभागी झाले. व्यवसायात उतरण्यापूर्वी त्यांनी संपूर्ण माहिती मिळवली.

हे देखिल वाचा-

शेळीपालक अमोल शिरकर
Goat Farming: शेतकऱ्यांना दिलासा! शेळी-मेंढीपालन योजनेला मंजुरी; सरकार देणार येवढं अनुदान; वाचा सविस्तर

५ लाखांचं कर्ज घेऊन सुरु केला व्यवसाय

अमोल यांनी बँकेतून कर्ज घेऊन व्यवसाय करण्याचं ठरवलं. यासाठी त्यांनी बँक ऑफ इंडियातून ५ लाखांचं कर्ज घेतलं आणि शेळीपालनासाठी एक युनिट उभारलं. उस्मानाबादी शेळी पालनापासून त्यांनी या व्यवसायाला सुरुवात केली. मात्र त्यानंतर बाजारामध्ये इतर जातींच्या बकऱ्यांची देखील मोठी मागणी असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

अमोल यांनी व्यापार वाढवण्याच्या उद्देशांने विविध व्यापाऱ्यांची भेट घेतली त्यांच्याशी संपर्क वाढवला. त्यानंतर त्यांनी इतर जातींच्या शेळ्यांचा त्यांच्या गोट फार्ममध्ये समावेश केला. सध्या जमुनापुरी, शिरोही, कोटा आणि वेस्ट बंगाल यांसारख्या जातींच्या शेळ्यांचा त्यांचा गोट फार्ममध्ये समावेश आहे.

अमोल यांची सध्या स्वत:ची शिरकर अॅग्रो टेक नावाची कंपनी असून या कंपनीचा टर्नओव्हर १५ लाख रुपये आहे. त्यांच्या या कंपनीमध्ये शेळपालनामुळे १५ मजुरांना रोजगार देण्यात आला आहे. तसचं ते २५ गावांमध्ये सध्या सेवा देत आहेत.

अमोल यांनी नोकरीचा पर्याय न निवडता व्यवसाय करण्याचा निर्णय घेऊन चांगला नफा कमावला आहे. काही हजारांच्या पगाराच्या नोकरीसाठी धडपडणाऱ्या तरुणांसाठी अमोल यांनी एक चांगला आदर्श निर्माण केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com