उन्हाळी सोयाबीनने शेतकऱ्यांचे पारणे फिटले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Summer soybean

उन्हाळी सोयाबीनने शेतकऱ्यांचे पारणे फिटले

शिवणी : ज्या शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनचा पेरा केला ते सोयाबीन जोमात असल्याने बियाणाबाबत शेतकरी स्वयंपूर्ण झाल्याचे चित्र किनवट तालुक्यातील शिवणी व इस्लापूर परिसरात दिसून येत आहे. त्यामुळे खरिपाची पेरणी करता शेतकऱ्यांचा धावपळ करावी लागणार नाही आणि विकतच्या बियाणांतून शेतकऱ्याची फसवणूक तर होणारच नाही.

किनवट तालुक्यातील शिवणी व इस्लापूर परिसरात शेतकऱ्यांची खरिपातील पिके हातातून गेल्याने अनेक शेतकऱ्यांनी रब्बी पिकात उन्हाळी सोयाबीनची पिके घेतली आहेत. खरिपात पेरलेले सोयाबीन अतिपावसामुळे पेरणीसाठीचे बियाणे ठेवण्याच्या योग्य नसल्याने खरीप पिकांच्या पेरणीसाठीचे बियाणे महागडी होती. प्रति बॅग तीन हजार चारशे ते तीन हजार पाचशे रुपये बॅग घेऊन शेतकऱ्यांना पेरणी करावी लागली होती. त्यामुळे या वर्षी रब्बीच्या पिकात वेगळा प्रयोग यशस्वी होत असताना पहावयास मिळत आहे.

खरीप हंगामात पीक जोमात असताना अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे सर्वाधिक फटका सोयाबीन उत्पादकांना बसला होता. या वेळी खरिपात झालेले नुकसान रब्बी हंगामात भरून निघेल, या आशेवर शेतकरी आहे. उन्हाळी हंगामातील सोयाबीनला शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहेत. यंदा पाण्याची उपलब्धता पाहून शेतकऱ्यांनी कमी क्षेत्रात हा प्रयोग केला आहे. या वर्षी सोयाबीनचा उतारा चांगला आला तर पुढील रब्बीच्या हंगामात नक्कीच सोयाबीनचा पेरा वाढणार आहे, यात शंका नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Web Title: Summer Soybean Farmer Seasonal Seeds Anxiety Subsided

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top