Share Market : सणासुदीच्या काळात हा गारमेंट स्टॉक देईल तगडा परतावा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market news

Share Market : सणासुदीच्या काळात हा गारमेंट स्टॉक देईल तगडा परतावा...

शेअर बाजारातील प्रचंड घसरणीच्या दरम्यान, तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांसाठी एक मजबूत स्टॉक निवडला आहे, जो गुंतवणूकदारांना चांगला परतावा देऊ शकतो. बाजार तज्ज्ञ संदीप जैन यांनी एसपी ऍपेरेल्सची (SP Apparels) निवड केली आहे. कंपनीने गेल्या 2 वर्षात जबरदस्त कामगिरी केली आहे. ही कंपनी गारमेंट क्षेत्रात आहे आणि ही कंपनी किड्स वेअरमध्येही चांगले काम करते.

देशात सध्या सणासुदीचा हंगाम सुरू झाला असून अशा वातावरणात गारमेंट सेक्टरला चांगली मागणी दिसून येते. येत्या काळात कपड्यांना मागणी वाढेल, त्यामुळे या स्टॉकमध्ये चांगली वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांना वाटते.

  • एसपी ऍपेरेल्स (SP Apparels)

  • सीएमपी (CMP) - 424 रुपये

  • टारगेट (Target) - 490/530 रुपये

हेही वाचा: Share Market : इंडस्ट्रियल सेक्टरचा 'हा' शेअर मल्टीबॅगर, अजूनही वाढ अपेक्षित

कंपनीचे फंडामेंटल्स ?

एसपी ऍपेरेल्स (SP Apparels) ही कंपनी 11 च्या PE मल्टिपलवर ट्रेड करते. याशिवाय, रिटर्न ऑन इक्विटी 14 टक्के आहे. गेल्या 7 वर्षातील नफ्याचा CAGR 36% आहे. याशिवाय, कंपनीने मजबूत तिमाही निकाल सादर केले आहेत.

जून 2021 मध्ये कंपनीने 11 कोटी रुपयांचा नफा सादर केला होता, त्यानंतर जून 2022 मध्ये कंपनीने 26 कोटी रुपयांचा नफा सादर केला. याशिवाय कंपनीतील प्रमोटर्सची हिस्सेदारी 62 टक्के आहे आणि देशी आणि विदेशी गुंतवणूकदारांची एकूण भागीदारी सुमारे 17-18 टक्के आहे.

हेही वाचा: Share Market: पॉवर सेक्टरचा 'हा' शेअर तुमचा पोर्टफोलिओ करेल दमदार

एसपी ऍपेरेल्स (SP Apparels) लवकरच बायबॅक आणणार आहे. कंपनीच्या बायबॅकला बोर्डाने मान्यता दिली असून कंपनी पुन्हा त्याचे शेअर्स खरेदी करणार आहे. हा बायबॅक टेंडर पद्धतीने केला जाणार आहे. कंपनी आता 6 लाख शेअर्स बायबॅक करणार आहे. त्यांची फेस व्हॅल्यू 10 रुपये असल्याचे सांगितले जात आहे. कंपनी आपल्या गुंतवणूकदारांकडून 585 रुपये प्रति शेअर या दराने शेअर्स पुन्हा खरेदी करेल. या बायबॅकचा आकार 35.10 कोटी रुपये आहे, जो इक्विटी शेअर भांडवलाच्या 5.68 टक्के आहे. यासाठी कंपनीने 7 ऑक्टोबर 2022 ही रेकॉर्ड डेट ठेवली आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.