लाडसावंगी परिसरात दोनशे एकर क्षेत्रावर टोमॅटो लागवड

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 ऑगस्ट 2018

लाडसावंगी - लाडसावंगीसह (ता. औरंगाबाद) परिसरातील सय्यदपूर, मुरूमखेडा, पिंपळखुंटा, औरंगपूर, सेलूद व चारठा या गावांत खरीप हंगामातील मका-कपाशी पिकाची लागवड कमी करून अवघ्या अडीच महिन्यांत पैसा मिळवून देणारे टोमॅटोची लागवड परिसरातील शिवारात दोनशे एकरांपर्यंत झाली आहे. मे महिन्यात रोपे तयार करून पाऊस पडताच लागवड करण्यात येते.

उन्हाळ्यातील विहिरीचे पाणी उपसा न करता साठून ठेवून त्या उपलब्ध पाण्यावर ठिबक सिंचनाच्या माध्यमातून व पडणाऱ्या पावसावर टोमॅटो पीक शेतकरी घेत आहेत. शेती ही सर्वस्वी पावसावर अवलंबून आहे. मॉन्सून संपूर्ण देशात एकाचवेळी पोचत नाही. उत्तर भारताच्या अगोदर महारष्ट्रात पाऊस पडण्यास जून महिन्यात सुरवात होते. हीच बाब हेरून व वरुड काजी (ता. औरंगाबाद) येथून औरंगाबाद तालुक्‍यातील उत्पादन होणारा टोमॅटो थेट दिल्लीच्या बाजारपेठेत पोचविण्याची व्यवस्था असल्याने ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात दर चांगला मिळतो. त्यामुळे लाडसावंगी परिसरातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पारंपरिक पिकाची लागवड कमी करून दहा-वीस गुंठे ते एक एकर क्षेत्रापर्यंत टोमॅटो, मिरची, वाल, वेलवर्गीय भाजीपाला पिके घेण्याकडे कल वाढला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tomato planting on two hundred acres of area