हळद शिजविण्यासाठी कुकरचा वापर

प्रतिनिधी
गुरुवार, 11 एप्रिल 2019

हळद शिजविण्यासाठी कुकरचा वापर वाढला आहे. त्यामुळे मजूर, इंधन यावरील खर्च कमी झाला आहे. वेळ आणि पाणीदेखील कमी लागत आहे. सुरक्षितरित्या हळद शिजवता येत आहे. हळदीची प्रत चांगली रहात आहे. त्यामुळे चांगला बाजारभाव मिळत आहे.

हिंगोली - हळद शिजविण्यासाठी कुकरचा वापर वाढला आहे. त्यामुळे मजूर, इंधन यावरील खर्च कमी झाला आहे. वेळ आणि पाणीदेखील कमी लागत आहे. सुरक्षितरित्या हळद शिजवता येत आहे. हळदीची प्रत चांगली रहात आहे. त्यामुळे चांगला बाजारभाव मिळत आहे.

हिंगोली जिल्ह्यापाठोपाठ शेजारील नांदेड, परभणी या जिल्ह्यामध्ये कमी पाण्यावर चांगले उत्पादन देणाऱ्या हळदीच्या क्षेत्रात दरवर्षी वाढ होत. पारंपरिक पद्धतीत शेतकरी हळद शिजविण्यासाठी कढईचा वापर करत असत. त्यासाठी चुलांगण खोदावे लागे. चुलांगणावर हळद शिजविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लाकूड फाटा लागत असे. जाळ कमी जास्त झाल्यास कढईच्या आधणातील बुडाची हळद करपत असे. चुलांगणवरून कढई लवंडल्यास तसेच कढईमध्ये पडून अपघात होत असत. या पद्धतीने शिजविलेली हळद वाळण्यासाठी वेळ लागत असे. परंतु, गेल्या ८ ते ९ वर्षांपासून कुकरचा वापर केला जात आहे. कुकरमुळे मजुरांची संख्या तीन ते चार पर्यंत कमी झाली आहे. इंधन आणि पाणीदेखील कमी लागत आहे. शिजविलेली हळद लवकर वाळत असून प्रतदेखील चांगली राहत आहे. त्यामुळे चांगले दर मिळत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Use cooker to cook turmeric