पुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

पुणे  - गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ९) सुमारे १६० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली होती. आवक आणि मागणी स्थिर असल्याने विविध भाजीपाल्यांचे दर स्थिर होते. पालेभाज्यांमध्ये मुळ्याचे दर शेकड्याला २ हजार रुपयांपर्यंत वाढले होते. दुष्काळी परिस्थितीमध्ये मुळ्याचे उत्पादन घटल्याने दर वाढले आहेत. 

पुणे  - गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ९) सुमारे १६० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली होती. आवक आणि मागणी स्थिर असल्याने विविध भाजीपाल्यांचे दर स्थिर होते. पालेभाज्यांमध्ये मुळ्याचे दर शेकड्याला २ हजार रुपयांपर्यंत वाढले होते. दुष्काळी परिस्थितीमध्ये मुळ्याचे उत्पादन घटल्याने दर वाढले आहेत. 

परराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे ५ ट्रक कोबी, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश येथून १४ ते १५ टेंपो हिरवी मिरची, बंगलोर येथून ७ टेंपो आले, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून ३ ते ४ टेंपो शेवगा, राजस्थान येथून १० ट्रक गाजर, मध्य प्रदेश येथून २० तर पंजाब येथून ३ ट्रक मटार, मध्य प्रदेश आणि गुजरात मधून लसणाची सुमारे ५ हजार गोणी आवक झाली होती.

महाराष्ट्राच्या विविध भागांतून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार ५०० गोणी, टॉमेटोे सुमारे ५ हजार क्रेट, कोबी फ्लॉवर प्रत्येकी सुमारे १५ टेंपो, भेंडी ७ टेंपो, ढोबळी मिरची १० टेंपो, हिरवी मिरची ५ टेंपो, पावटा ५ टेंपो, गवार ३ टेंपो काकडी १० टेंपो,  शेवगा ३ टेंपो, भुईमूग शेंग ५० गोणी, तसेच नवीन कांदा सुमारे ३० तर जुना सुमारे ७० ट्रक, आग्रा, इंदूर आणि तळेगाव येथून बटाट्याची ६० ट्रक आवक झाली होती.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव - 
कांदा - जुना ५०-९०, जुना ८०-१२०, बटाटा - आग्रा २०-८०, इंदूर १८०-२००, लसूण - १५०-२००, आले - सातारी - बंगलोर - ५००-६००, भेंडी - २५०-३००, गवार - गावरान, सुरती ४००-५००, टोमॅटो - ६०-१००, दोडका - २५०-३००, हिरवी मिरची - १५०-२००, दुधी भोपळा - ६०-१२०, चवळी - १५०-२००, काकडी - १२०-१६०, कारली - हिरवी २५०-२६०, पांढरी - १८०-२००, पापडी - २००-२२०, पडवळ - १४०-१६०, फ्लॉवर - ४०-६०, कोबी - ३०-६०, वांगी - १००-२००, डिंगरी - १४०-१५०, नवलकोल - ८०-१००, ढोबळी मिरची - २००-२५०, तोंडली - कळी १८०-२००, जाड - ९०-१००, शेवगा - ३५०-४००, गाजर - १२०-१८०, वालवर - २००-२५०, बीट - ८०-१००, घेवडा - २००-२५०, कोहळा - १५०-२००, आर्वी - ३००-३५०, घोसावळे - १६०-१८०, ढेमसे - ३००-३२०, भुईमूग - ४००-५००, पावटा - २००-३००, मटार - ३००-३५०, तांबडा भोपळा - ६०-१००, सूरण - २२०-२४०, मका कणीस - ६०-१००, नारळ (शेकडा) - १०००-१६००.

पालेभाज्या
पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर सुमारे २ लाख, तर मेथीची सुमारे ८० हजार जुड्या आवक झाली होती.

पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) - 
कोथिंबीर - ५००-१०००, मेथी - ५००-८००, शेपू - ७००-९००, कांदापात - ६००-८००, चाकवत - ५००-६००, करडई - ५००-६००, पुदिना - २००-४००, अंबाडी - ५००-६००, मुळे - २०००-२२००, राजगिरा - ४००-५००, चुका - ८००-१०००, चवळई - ५००-६००, पालक - ४००-५००, हरभरा गड्डी - ४००-६००.

फळबाजार
रविवारी (ता. ९) फळ विभागात मोसंबी सुमारे १०० टन, संत्री १० टन, डाळिंब २०० टन, पपई २० टेंपोे, लिंबे सुमारे ४ हजार गोणी, चिकू २ हजार बॉक्स आणि गोणी, पेरू २ हजार क्रेटस्, कलिंगड २५ टेंपो, खरबूज १० ते १२ टेंपो, विविध जातींची बोरे सुमारे अडीच हजार गोणी, सीताफळ सुमारे ६ टन आणि द्राक्ष सुमारे ५ ते ७  आवक झाली होती.

फळांचे दर पुढीलप्रमाणे - 
लिंबे (प्रतिगोणी) - २००-४५०, मोसंबी - (३ डझन) - १२०-२५०, (४ डझन ) - ६०-१७०, संत्रा - (३ डझन) १२०-२५०, (४ डझन) - ६०-१७०, डाळिंब (प्रतिकिलोस) - भगवा - २०-६०, गणेश ५-२०, आरक्ता १०-३०. कलिंगड - ५-१०, खरबूज - १०-२०, पपई - ५-१५, चिकू - १००-५००, पेरू (२० किलो) - ३००-६००, सीताफळ - ३०-२००, सफरचंद - सिमला (२५ किलो) १४००-१८००, किन्नोर - (२५ ते २८ किलो) २३००-३०००, काश्मीर डिलिशिअस - (१५ किलो) ७००-१३००, बोरे - चेकनट (१० किलो) २२०-२७०, उमराण (१० किलो) ५०-६०, चमेली (१० किलो) ९०-१४०, चण्यामण्या २८०-३२०. द्राक्षे - तास-ए-गणेश १५ किलो १२०० ते १६००, जम्बो १० किलो ८०० ते ११००.

आवळ्याचा हंगाम सुरू
औषधी गुणधर्म असलेला आणि आयुर्वेदाकडून विशेष मागणी असलेल्या आवळ्याचा हंगाम सुरू झाला असून, बाजार समितीमध्ये राजस्थान आणि स्थानिक सुमारे १५ टन आवक होत असल्याची माहिती आवळ्याचे प्रमुख आडतदार विलास निलंगे यांनी दिली. साधारण नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आवळ्याची आवक सुरू होऊन मार्चअखेरपर्यंत आवक असते. राजस्थान येथून चकाया तर मालेगाव आणि करमाळा भागातून एन-७ वाणांची प्रामुख्याने आवक होत असते. यामध्ये राजस्थानची आवक सुमारे १० तर स्थानिक आवक सुमारे ५ टन असते. एन-७ वाणाचा आवळा चमकदार असून, आकाराने गोल तर चकाया वाणाचे फळ थोडे चपटे असल्याचे निलंगे यांनी सांगितले. या दोन्ही आवळ्यांना प्रतिकिलोला २५ ते ३५ रुपयांपर्यंत दर आहे. आवळ्याला प्रामुख्याने चवनप्राश, रस, कॅंडी प्रक्रिया उद्योगांकडून मागणी आहे. तर विविध आयुर्वेदाचार्यदेखील खरेदी करत असल्याचे निलंगे यांनी सांगितले. तर यंदाच्या दुष्‍काळी परिस्थितीमुळे सुमारे ७० टक्क्‍यांपर्यंत उत्पादन घटले असून, दर वाढण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vegetables prices stable in Pune market