जळगाव जिल्ह्यातील २०५ गावे ‘जलयुक्त'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 फेब्रुवारी 2019

जळगाव - जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१७-२०१८ मध्ये निवडलेल्या २०६ गावांमध्ये विविध यंत्रणेमार्फत करण्यात आलेल्या कामांमुळे २०५ गावे जलयुक्त झाली आहेत. यासंदर्भात धडक कार्यक्रम राबविला जात असून, या वित्तीय वर्षातील कामेही गतीने सुरू आहेत. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१७-१८ मध्ये निवड करण्यात आलेल्या २०६ कामांमध्ये ४ हजार ९७ कामे प्रस्तावित करण्यात आली होती. त्यापैकी ४ हजार ७९ कामे पूर्ण झालेली आहेत. १३ कामे प्रगतिपथावर आहेत. या कामांवर आतापर्यंत ५३ कोटी २८ लाख रुपये खर्च झाल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

‘मागेल त्याला शेततळे' योजनेंतर्गत जिल्ह्याला २ हजार शेततळ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यातील ४ हजार ५४७ शेतकरी यांचे अर्ज मंजूर करण्यात आले. ३ हजार ५ अर्जदारांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. यापैकी १ हजार ९७४ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत, तर ४२ कामे प्रगतिपथावर आहेत.

मुडीच्या ब्रिटिशकालीन फड बंधाऱ्यांची होणार दुरुस्ती
मुडी (ता. अमळनेर, जि. जळगाव) येथील ब्रिटिशकालीन फड बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी आमदार स्मिता वाघ यांच्या प्रयत्नातून ३३ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे या बंधाऱ्याची दुरुस्ती होऊन पाणी साठा वाढण्यास मदत होणार आहे. मुडी येथील ब्रिटिशकालीन बंधाऱ्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. यासाठी आमदार स्मिता वाघ यांच्या प्रयत्नांनी धुळे पाटबंधारे विभाग व जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जलयुक्त शिवारांतर्गत बंधारा दुरुस्तीसाठी ३३ लाख निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. दुरुस्तीची निविदाही प्रगतिपथावर असून, उर्वरित कालवा खोलीकरण व विस्तारित कामाचा जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी विभागाच्या माध्यमातून नुकताच प्रारंभ करण्यात आला. गेल्या १८ ते २० वर्षांपासून या बंधाऱ्याचा डाव्या तीरावरील भाग वाहून गेल्याने बंधारा परिसरातील मुडी, मांडळ, लोण, एकतास, एकलहरे, शहापूर या परिसरातील सुमारे २५० हेक्‍टर शेतजमीन सिंचनापासून वंचित राहिली होती.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water conservation of 205 villages of Jalgaon district